abhishek bachchan  saam tv
Sports

डब्लिनमध्ये अभिषेक बच्चनचे जल्लोषात स्वागत! ETPL प्रचारासाठी मिळाला मोठा पाठिंबा

Abhishek Bachchan: सुप्रसिद्ध अभिनेते, उद्योजक आणि क्रीडाप्रेमी अभिषेक बच्चन यांचे डब्लिनमध्ये जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले

Saam TV News

सुप्रसिद्ध अभिनेते, उद्योजक आणि क्रीडाप्रेमी अभिषेक बच्चन यांचे डब्लिनमध्ये जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले, जिथे त्यांनी युरोपियन टी20 प्रीमियर लीग (ETPL) च्या प्रमोशनसाठी सहभाग घेतला. ETPL ही ICC मान्यताप्राप्त टी20 फ्रँचायझी लीग आहे जी क्रिकेटच्या जागतिक प्रभावाला नवीन उंचीवर नेण्यास सज्ज आहे. या लीगद्वारे आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स यांच्यातील ऐक्य अधिक दृढ होत आहे, तसेच जगभरातील नामांकित खेळाडूंना आकर्षित केले जात आहे.

येत्या 15 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत, त्यामुळे ETPL आंतरराष्ट्रीय टी20 कॅलेंडरवरील एक प्रतिष्ठित स्पर्धा ठरणार आहे. लीगचा पहिला हंगाम डब्लिन आणि रॉटरडॅम येथे रंगणार असून, क्रिकेटचा युरोपातील वाढता प्रभाव साजरा करण्यासाठी चाहत्यांना एकत्र आणले जाणार आहे.

आयर्लंडमध्ये उत्स्फूर्त स्वागत आणि भारतीय दूतावासाला भेट

ETPL च्या प्रमोशनल टूरचा एक भाग म्हणून अभिषेक बच्चन यांनी आयर्लंडच्या प्रसिद्ध "सेंट पॅट्रिक्स डे" उत्सवातही सहभाग घेतला, जिथे त्यांना स्थानिक चाहत्यांकडून आणि भारतीय वंशाच्या लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी डब्लिन येथील भारतीय दूतावासालाही भेट दिली, जिथे भारताचे आयर्लंडमधील राजदूत श्री अखिलेश मिश्रा यांनी त्यांचे स्वागत केले.

ETPL चे सह-मालक प्रियंका कौल आणि सौरव बॅनर्जी यांच्यासह अभिषेक बच्चन यांचा "क्रिकेट आयर्लंड" चे CEO वॉरेन ड्युट्रॉम आणि आयर्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन ओब्रायन यांनी पारंपरिक "शॅम्रॉक" सन्मानाने गौरव केला. या क्षणाने ETPL च्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील जागतिक दृष्टीकोनाला अधोरेखित केले. केविन ओब्रायन यांचा सहभाग यामुळे लीग आणि आयर्लंडच्या समृद्ध क्रिकेट परंपरेतील मजबूत नातेसंबंध अधोरेखित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

बिबट्या दबक्या पावलांनी शिरला गोठ्यात, शिकारीवर झडप टाकणार तेवढ्यात शेतकऱ्याने शिकवला धडा

Ketaki Chitale: मराठी बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार आहेत का?, केतकी चितळेचे वादग्रस्त विधान; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT