Abhijeet Katke
Abhijeet Katke Saam TV
क्रीडा | IPL

पुण्याचा अभिजीत कटके ठरला 'हिंद केसरी', हरियाणाच्या पैलवानाला केलं चितपट

Dnyaneshwar Choutmal

Abhijeet Katake: तेलंगणात पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अभिजीतच्या विजयामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.

तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना हरियाणाच्या सोनूवीर आणि महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेमध्ये रंगला. मात्र अभिजीतने आपला दबदबा कायम राखत हिंद केसरीवर आपलं नाव कोरलं.

स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे विजय चौधरी स्पर्धेमधून बाहेर पडला आहे.

अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT