Ind vs SL T20 Series: जास्त नादवू नका! मालिका जिंकले; 'या' गोष्टीने वाढवले टीम इंडियाचे टेंन्शन

सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीही अप्रतिम झाली, तरीही एका गोष्टीने टीम इंडियाची चिंता अद्याप वाढवली आहे.
IND vs SL 1st T20
IND vs SL 1st T20 Saam Tv

Ind vs SL T20 Siries: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर सध्या टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरा सामना गमावल्यानंतर टीम इंडियापुढे शेवटचा सामना जिंकण्याचे आव्हान होते. भारतीय संघानेही शेवटच्या सामन्यात दमदार खेळ करत मालिका खिशात घातली. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीही अप्रतिम झाली, तरीही एका गोष्टीने टीम इंडियाची चिंता अद्याप वाढवली आहे. काय आहे ती गोष्ट चला जाणून घेवू.

IND vs SL 1st T20
Sanjay Raut: पुन्हा राजकारण तापणार! संजय राऊतांची जिभ घसरली, भाजपा नेत्यांना म्हणाले; 'हा अपमान सहन करणारे सर्व....'

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेचा टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव केला. राजकोट T20 मध्ये टीम इंडियाने 91 धावांनी विजय मिळवला. टीम इंडिया जिंकली, सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हिरोसारखे चमकले. मात्र यानंतरही एका गोष्टीने भारतीय संघाची चिंता वाढताना दिसत आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) टी-20 मालिकेवर नजर टाकल्यास भारतीय संघाने या काळात खूप अतिरिक्त धावा दिल्या. भारतीय गोलंदाज सतत वाईड आणि नो-बॉल टाकताना दिसत होते. या तीनही सामन्यांत टीम इंडियाने या मालिकेत 31 अतिरिक्त धावा दिल्या. यापैकी भारताने शेवटच्या T20 सामन्यात सर्वाधिक 13 धावा दिल्या, जिथे श्रीलंकेचा संघ केवळ 137 धावांवर ऑलआऊट झाला.

IND vs SL 1st T20
Hingoli News: आमदार संतोष बांगरांचा ताफा गावाबाहेरच अडवला, ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

भारतीय संघाने पहिल्या टी ट्वेंटी (T20) सामन्यात तब्बल सहा अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये चार वाईड, एक नो बॉल तर एक लेग बायची धाव होती. त्याचसोबत दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात १२ अतिरिक्त धावा तर तिसऱ्या सामन्यात तब्बल १३ अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये तब्बल १२ वाईड बॉल टाकले. त्यामुळेच टीम इंडियाच्या या अतिरिक्त धावांनी चिंता वाढवणारी आहे. यामध्ये अर्शदिप सिंगने पाच नो बॉल आणि चार वाईड बॉल टाकले. तर उमरान मलिकने पाच वाईड आणि दोन नो बॉल टाकले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com