Abdullah Shafique catch twitter
Sports

WATCH: पैज लावा! शॉर्ट लेगला टिपलेला असा कॅच तुम्ही पाहिलाच नसेल; पाहा 'ऑल टाईम ग्रेट' कॅचचा VIDEO

Abdullah Shafique catch: अब्दुल्ला शफीकने टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Srilanka vs Pakistan 1st Test: पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दमदार कामगिरी करत ४ गडी राखून विजय मिळवला आहे.

दरम्यान या सामन्यात पाकिस्तानच्या विजयापेक्षा अब्दुल्ला शफीकने टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Abdullah Shafique catch)

पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी कितीही दमदार असली तरी ते आपल्या फिल्डिंगमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र अब्दुल्ला शफीकने भन्नाट झेल टिपून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अब्दुल्ला शफीक शॉर्ट लेगला फिल्डिंग करत होता. त्यावेळी त्याने सदिरा समरविक्रमाचा झेल टिपला.

अब्दुल्ला शफीकचा भन्नाट झेल..

श्रीलंका संघाची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरू असताना ५६ वे षटक टाकण्यासाठी सलमान अली आगा गोलंदाजीला आला होता. आगाने टाकलेल्या चेंडूवर सदिरा समरविक्रमाने पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटचा कडा घेत शॉर्ट लेगच्या दिशेने गेला. चेंडू बॅटला लागताच अब्दुल्ला शफीकने स्फूर्ती दाखवत उजव्या बाजूला डाईव्ह मारली आणि एकहाती भन्नाट झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Latest sports updates)

पाकिस्तानचा जोरदार विजय..

श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या २७९ धावांवर संपुष्टात आला होता. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १३१ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून इमाम उल् हकने नाबाद ५० आणि सौद शकीलने ३० धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला ४ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तान संघाने कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज दिवे घाटातील वाहतूक दुपारी २ तास राहणार बंद

मनोज जरांगेंच्या बॉम्बनंतर शिवसेना आक्रमक; CM नंतर आता थेट PM मोदींकडे केली मोठी मागणी

Morning Drinks : रक्तातील साखर झपाट्याने वाढतेय? सकाळी हे ६ ड्रिंक घ्या, ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Horoscope : शुक्रवार तुमच्यासाठी कसा ठरेल? ‘या’ राशींच्या नशिबात मोठा धनलाभ, तर काहींना राहावे लागेल सावध

Maharashtra School Holiday: राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT