hardik pandya saam tv
Sports

Aakash Chopra Statement: 'असं वाटलं दहाच खेळाडू होते..',दारूण पराभवानंतर माजी क्रिकेटपटूने घेतली हार्दिक पंड्याची शाळा,म्हणाला..

Aakash Chopra On Hardik Pandya: या सुमार कामगिरीनंतर माजी खेळाडूने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

Ankush Dhavre

Aakash Chopra Statement On Hardik Pandya:

भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना रविवारी पार पडला. या निर्णायक सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवासह भारतीय संघाने २-३ ने टी -२० मालिका गमावली आहे. गेल्या १७ वर्षात पहिल्यांदाच ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने गमावले आहेत. दरम्यान या सुमार कामगिरीनंतर माजी खेळाडूने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने हार्दिक पंड्याची शाळा घेतली आहे. त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, ' जेव्हा तुम्ही इथे गोलंदाजी करण्यासाठी आले तेव्हा गोष्ट नवीनच होती. गेल्या सामन्यात अक्षर पटेलने पहिले षटक टाकले, या सामन्यात त्याला एकही षटक टाकता आले नाही. ज्याप्रकारे अक्षर पटेलचा वापर केला गेला आहे, आम्हाला खरंच माहीत नाही असं का झालं. '

तसेच तो पुढे म्हणाला की, ' तुम्ही असं म्हणता की, निकोलस पूरन फलंदाजीला असेल तर कुलदीप यादव गोलंदाजी करेल. नाहीतर अक्षर पटेल आपले षटक पूर्ण करेल. जर निकोलस पूरन वरच्या फळीत फलंदाजीला आला तर तुम्ही काय कराल? जेव्हा अर्शदीप सिंगने काइल मेयर्सला बाद केलं त्यावेळी तो वरच्या फळीत फलंदाजीला आला होता. अक्षर पटेलचा वापर केला जात नाहीये. असं वाटतंय आपण १० खेळाडूंसोबत खेळतोय.' (Latest sports updates)

तिलक वर्माने निकोलस पूरनला बाद केल्यानंतर १५ व्या षटकात अक्षर पटेलला गोलंदाजी देण्यात आली. या षटकात त्याने ८ धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. मुकेश कुमारला देखील नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. वनडे मालिकेत जेव्हा त्याने नव्या चेंडूने गोलंदाजी केली. त्यावेळी त्याने विकेट्स काढून दिले होते. असं आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बसपाचा 'हत्ती' सुसाट; अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली

India Vs Pakistan: दुबईत अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये तुफान वाद, नेमकं काय घडलं? वाचा प्रकरण...

Konkan Tourism : रत्नागिरीत लपलाय सुंदर किनारा, अनुभवाल कोकणातील अस्सल सागरी सौंदर्य

Maharashtra Nagar Palika Election Result Live: अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांचा सुवर्ण विजय

Nagarpalika Nagar Parishad Election Result: नागपूर जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश, वाचा संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदांचा निकाल

SCROLL FOR NEXT