Sachin Tendulkar saam tv
Sports

Sachin Tendulkar: विमानात रंगला क्रिकेटचा खेळ! सून सानिया चंडोकने सचिनला केलं आउट, साराने पकडला भन्नाट कॅच

Family Cricket: सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या मजेशीर व्हिडीओत सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोक त्याला बाद करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अखेरीस साराने शानदार कॅच घेत सचिनला आऊट केल्याने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असतो. क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांना घाम फोडणारा हा महान फलंदाज घरच्या मैदानावरही तितकाच रंगात असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओत पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या वेळी सचिनसोबत त्याची मुलगी सारा तेंडुलकर आणि अर्जुनची पत्नी सानिया चंडोकसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

सचिनने आपल्या एक्स अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीने सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहेत. व्हिडीओसोबत सचिनने एक खास संदेशही दिला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "उंची कितीही गाठली तरी माणसाचा स्वभाव आणि दृष्टिकोन बदलता कामा नये."

व्हिडीओमध्ये सचिन फलंदाजी करताना दिसतोय. तर सारा तेंडुलकर आणि सचिनची सून सानिया त्याला बाद करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. खेळादरम्यान सारा एक कॅच घेण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला त्यात यश येत नाही. त्यानंतर सचिन आपल्या खास मिश्किल अंदाजात म्हणतो, "Guys, you'll never be able to get me out. You'll never be able to get me out." म्हणजेच, "तुम्ही मला कधीच आऊट करू शकणार नाही."

यानंतर सचिन बॅट वेगळ्या पद्धतीने पकडत म्हणतो, "Only way, there is only remote possibility if the bat is like this." म्हणजेच, "बॅट अशी धरली तरच मला बाद करण्याची थोडीफार शक्यता आहे," असा त्याचा मजेशीर इशारा असतो. हा संपूर्ण व्हिडीओ एका प्लेनमध्ये असल्याचं दिसतंय.

मात्र अखेरीस साराने अप्रतिम कॅच घेतला आणि सचिन आऊट झाल्याचं दिसतंय. सचिन बाद होताच उपस्थित सर्वजण मोठ्याने हसू लागतात. या व्हिडीओत वडील आणि मुलीमधील सुंदर नातं, मोकळेपणा आणि घरगुती वातावरणातील मजेशीर क्षण पाहायला मिळतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT