Latest wtc points table Saam tv news
Sports

WTC Points Table : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर

WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा ताज पटकावला आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर घसरली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. पर्थच्या ऑप्टस स्टेडिममध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे. इतकंच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा ताज पटकावला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजनंतर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, मात्र ऑस्ट्रेलियाला खाली खेचत पुन्हा एकदा भारताने नंबर १ चा मुकूट काबिज केलाय.

ऑस्ट्रेलिया पुन्हा दुसऱ्या स्थानावर

पर्थमध्ये झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरलीये. याव्यतिरिक्त पॉईंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पर्थमधील ऑप्टसमध्ये झालेल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभव पत्करावा लागला.

पॉईंट्स टेबलमध्ये काय झाले बदल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ टेस्ट सामन्यानंतर भारत 61.11 च्या विजयाच्या टक्केवारीसह WTC पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाची टीम 57.59 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये. श्रीलंकेची टीम सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे. तर न्यूझीलंड ५४.५५ टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेची टीम पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 54.17 असून इंग्लंडची टीम ४०.७९ टक्के विजयासह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर असून त्यांची टक्केवारी केवळ 33.33 आहे. यानंतर इंग्लंडची टीम असून 27.50 टक्के विजयाच्या टक्केवारीसह 8व्या स्थानावर आहे.

पर्थमध्ये टीम इंडियाचा विजय

पर्थमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पर्थ टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 रन्सने पराभव करून इतिहास रचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT