Big blow to Australia ahead of Border-Gavaskar saam tv
Sports

India vs Australia: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू झाला जखमी, खेळण्यावर प्रश्नचिन्ह!

India vs Australia: २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी या काळात भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. दरम्यान या सिरीजपूर्वी टीमचा मॅचविनर खेळाडू जखमी झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशची फायनल पाहता टीम इंडियासाठी प्रत्येक टेस्ट सामना आणि सिरीज महत्त्वाची आहे. बांगलादेशानंतर न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडियाला टेस्ट सिरीज खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे. २२ नोव्हेंबरपासून या सिरीजला सुरुवात होणार आहे. मात्र या सिरीजपूर्वी टीमला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी या कालावधीमध्ये ही सिरीज खेळवली जाणार आहे. दरम्यान या सिरीजपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमचा मॅचविनर खेळाडू जखमी झाला आहे. त्यामुळे कांगारूंचं टेन्शन वाढलं आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा झटका

22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर सिरीजपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू कॅमेरून ग्रीन जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी ग्रीन पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भारताविरुद्धच्या पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी तो खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

ऑस्ट्रेलियाचा 25 वर्षीय खेळाडू कॅमेरून ग्रीन बुधवारी चेस्टर-ले-स्ट्रीटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर दुखापतीच्या कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे सिरीजमधील शेवटच्या दोन सामन्यांमधून बाहेर पडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, दुखापतीमुळे त्याला शुक्रवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या चौथ्या वनडेतूनही मुकावं लागणार आहे.

कॅमरून ग्रीनची दुखापत किती गंभीर?

स्कॅनमध्ये पाठीला दुखापत किती गंभीर आहे, यानंतर तो भारताविरूद्ध खेळणार की नाही हे निश्चित होणार आहे. 'cricket.com.au' नुसार, ऑस्ट्रेलियन पुरुष टीमच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन पर्थला पोहोचेपर्यंत त्यांच्या दुखापतीची गंभीरता आणि तो कमबॅक कधी करेल हे सांगता येणार नाही.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजचं शेड्यूल

  • पहिली टेस्ट - 19 नोव्हेंबर 2024 ते 26 नोव्हेंबर2024, सकाळी 8:00 सकाळी, पर्थ

  • दुसरी टेस्ट - 6 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024, सकाळी 9:30 सकाळी, एडिलेड

  • तिसरी टेस्ट - 14 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2024, सकाळी 5:30 सकाळी, ब्रिस्बेन

  • चौथी टेस्ट - 26 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024, सकाळी 5:30 सकाळी, मेलबर्न

  • पाचवी टेस्ट - 3 जानेवारी 2025 ते 7 जानेवारी 2025, सकाळी 5:30 सकाळी, सिडनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT