Jasprit Bumrah Fitness Saam TV
Sports

Jasprit Bumrah : टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी; बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतून मॅचविनर खेळाडू बाहेर!

टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा मॅचविनर गोलंदाज जसप्रीत बुमराह हा बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

Satish Daud

Jasprit Bumrah Fitness News : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळला जात असून भारताने दुसऱ्याच दिवशी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. यादरम्यान, टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा मॅचविनर गोलंदाज जसप्रीत बुमराह हा बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. (Latest Sports Update)

जयप्रीत बुमराह हा आधीच दुखापतग्रस्त आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. तो शेवटच्या दोन कसोटी सामन्यात (India vs Australia) पुनरागमन करेल अशी, क्रिकेटप्रेमींना आशा होती. मात्र, मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्येही पुनरागमन करू शकणार नाही. याचा अर्थ तो संपूर्ण बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असणार नाही.

एका क्रिडा वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच सप्टेंबर महिन्यात भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. तोपर्यंत जसप्रीत बुमराह हा पूर्णपणे फिट असावा, असं टीम इंडियाच्या निवड समितीचं म्हणणं आहे.

त्याकरीता त्यांनी कसोटी मालिकेत बुमराहाबाबत धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिकेत भाग घेण्याऐवजी बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ दिला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह गेल्या काही दिवसांपासून एनसीएमध्ये संपूर्ण आपल्या गोलंदाजीचा सराव करत आहे.

बुमराहच्या फिटनेसमध्ये सुधारणा दिसून आली असली तरी, अद्यापही त्याच्या गोलंदाजीला पहिल्यासारखी धार दिसत नाहीये. ही बाब बीसीसीआयचं टेन्शन वाढवणारी आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुमराहचा विचार केला जात नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ ते २२ मार्च दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह हा पुनरागमन करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर भारतात आयपीएलचा हंगाम सुरू होणार असून या हंगामात बुमराह आपली लय पकडेल, अशी अपेक्षा अनेकजण व्यक्त करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT