coronavirus in yonex sunrise india open 2022 saam tv
Sports

India Open 2022: किदांबी श्रीकांतसह ७ भारतीय खेळाडूंवर संक्रात; काेविड १९ ची लागण

या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीला आजपासून प्रारंभ होत आहे.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : योनेक्स- सनराइज इंडिया ओपन २०२२ (YONEX-SUNRISE India Open 2022) बॅडमिंटन स्पर्धेत सात खेळाडूंना कोविड-१९ ची (covid19) लागण झाली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) यास दुजाेरा दिला आहे. दरम्यान संबंधित सात खेळाडूंना काेविड १९ ची (COVID19) ची लागण झाल्याने त्यांना YONEX-SUNRISE इंडिया ओपन २०२२ याचे सामने खेळता येणार नाही असे संयाेजकांनी स्पष्ट केले आहे. (coronavirus in yonex sunrise india open 2022)

मंगळवारी घेतलेल्या RT-PCR चाचणीमध्ये खेळाडूंचा काेविड १९ चा (covid19) अहवाल पाॅझिटीव्ह आला. संबंधित सात खेळाडूंच्या निकटवर्तीयांना दुहेरी सामने खेळता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या बराेबरच मुख्य ड्रॉमध्ये खेळाडू बदलले जाणार नाहीत आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पुढील फेरीसाठी चाल देण्यात येईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व सहभागींचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आणि बॅडमिंटन (badminton) असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चाचणी प्रोटोकॉल लागू करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीला आजपासून प्रारंभ होत आहे.

या सात खेळाडूंना झाली काेविड १९ ची लागण

किदंबी श्रीकांत नम्मलवार (Kidambi Srikanth Nammalwar)

अश्विनी पोनप्पा (Ashwini Ponnappa)

रितिका राहुल ठक्कर (Ritika Rahul Thakkaar)

ट्रीसा जॉली (Treesa Jolly)

मिथुन मंजुनाथ (Mithun Manjunath)

सिमरन अमन सिंग (Simran Aman Singh)

खुशी गुप्ता (Khushi Gupta)

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT