european cricket twitter
क्रीडा

European T10 Cricket: एका ओव्हरमध्ये 41 धावा अन् 2 ओव्हरमध्ये 61 धावांचा पाठलाग! क्रिकेट इतिहासातील थरारक सामना - VIDEO

Romania vs Austria: क्रिकेट इतिहासातील सर्वात थरारक सामन्यात अवघ्या २ षटकात ६१ धावांचा पाठलाग करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे,असं म्हणतात. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत कोणीच सांगु शकत नाही की कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ पराभूत होणार. क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही अनेक अविश्वसनिय रेकॉर्ड्स होताना पाहिले असतील. असाच एक रेकॉर्ड रोमानिया आणि ऑस्ट्रिया यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

क्रिकेटमध्ये गोलंदाज एका षटकात ६ चेंडू टाकतो.या ६ चेंडूंवर ६ षटकार मारले,तरीदेखील ३६ धावा होतात. यात अतिरीक्त धावा असतील, तर धावांची संख्या ३७ किंवा ३८ वर जाते. मात्र कधी एका षटकात ४१ धावा आल्याचं ऐकलंय का? नाही ना? पण हा रेकॉर्ड रोमानिया विरुद्ध ऑस्ट्रिया यांच्यात झालेल्या सामन्यात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात विजय अनिश्चित होता. मात्र शेवटच्या २ षटकात असं काही घडलं की, पराभूत होत असलेल्या संघाने विजय मिळवला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रोमानिया संघाने १० षटकअखेर २ गडी बाद १६७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सामन्यातील आठव्या षटकापर्यंत रोमानियाचा संघ एकतर्फी विजय मिळवणार होता. मात्र ९ व्या षटकात असं काहीतरी घडलं ज्याचा कोणीच विचार केला नव्हता. धावांचा डोंगर सर करत असताना ऑस्ट्रियाच्या फलंदाजांनी ९ व्या षटकात ४१ धावा कुटल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात ४ षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

रोमानियाकडून फलंदाजी करताना अरियान मोहम्मदने ३९ चेंडूंचा सामना करत २६६.६७ च्या स्ट्राईक रेटने १०४ धावांची तुफानी खेळी केली. हा आंतरराष्ट्रीय सामना नव्हता.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा हर्षल गिब्सच्या नावावर आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा युवराज सिंगच्या नावावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT