CRICKET VIRAL VIDEO
CRICKET VIRAL VIDEO Saam tv
क्रीडा | IPL

CRICKET VIRAL VIDEO: अफलातून! ५२ वर्षीय लोकल बॉयची ग्लोबल कॅच; चित्यासारखी झेप घेत टिपला भन्नाट झेल, VIDEO बघा

Ankush Dhavre

VIRAL CATCH VIDEO: क्रिकेटचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू लांबच लांब डाईव्ह मारून झेल टिपल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल.

मात्र ५२ वर्षांच्या खेळाडूला कधी डाईव्ह मारून झेल टिपताना पाहिलं आहे का? क्वचितच पाहिलं असेल. मात्र एक झेल टिपल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Latest sports updates)

तुम्ही जॉन्टी रोड्स आणि रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंना झेल टिपताना पाहिलं आहे. हे खेळाडू किती ही लांब असले तर वेगाने धावत जाऊन डाईव्ह मारून झेल टिपत असतात. मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ५२ वर्षांच्या खेळाडूने डाईव्ह मारून भन्नाट झेल टिपला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फलंदाजाने सूर्यकुमार यादव स्टाईलने थर्डमॅनच्या दिशेने शॉट मारला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला. त्याचवेळी ५२ वर्षीय खेळाडूने डाव्या बाजूला डाईव्ह मारत भन्नाट एकहाती झेल टिपला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वयाच्या या टप्प्यात इतकी स्फूर्ती दाखवल्याने नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT