IPL 2022 Twitter/ @IPL
Sports

IPL 2022: 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी; असे बुक करा तिकीट...

वानखेडे स्टेडियम, MCA स्टेडियम, DY Patil स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम अशा चार स्टेडियमची निवड करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

आयपीएलचा (IPL 2022) १५ वा हंगाम २६ मार्चला सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकात नाईट रायडर्स (CSK vs KKR) असा रंगणार आहे. या हंगामातील सर्व साखळी सामने महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. मुंबई आणि पुण्यामध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत. या हंगामासाठी चार स्टेडियमची निवड करण्यात आली आहे.

वानखेडे स्टेडियम, MCA स्टेडियम, DY Patil स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम अशा चार स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) २५ टक्के प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामना बघण्यास परवानगी दिली आहे. तर प्रेक्षकांनी तिकीट कसे काढायचे? ते कुठे मिळतील? हे जाणून घ्या.

असे बुक करा तिकीट?

ज्यांना कोणाला सामना बघण्यासाठी मैदानात जायचे असेल त्यांनी Bookmyshow.com वरती जाऊन तिकीट बुक करु शकता. एका तिकीटावरती एक प्रेक्षक सामना बघण्यासाठी जाऊ शकतो. प्रेक्षक हा १८ वर्षावरील असावा आणि त्याने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. त्याचे प्रमाणपत्र त्याला गेटवरती दाखवावे लागेल. २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी असल्याने मैदान प्रशासनाने त्यांची आसन क्षमता जाहीर केली आहे. वानखेडे स्टेडियममध्ये ९८०० ते १००००, ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ७००० ते ८००० प्रेक्षक सामन्याचा आनंद घेवू शकतात. तसेच DY Patil स्टेडियम, MCA स्टेडियम पुणे यांची आसन क्षमता १२००० हजार ठेवण्यात आलेली आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रति तिकिट INR 2500 ते 4000 दरम्यान आहे, तर ब्रेबॉर्न स्टेडियममधील तिकिटाची किंमत प्रति तिकिट INR 3000 ते INR 3500 दरम्यान असणार आहे. DY पाटील स्टेडियममधील तिकिटांची किंमत INR 800 ते INR 2500 पर्यंत आहे, तर पुणे शहरातील MCA स्टेडियममधील तिकिटांची किंमत INR 1000 ते INR 8000 पर्यंत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT