R Ashwin Twitter
क्रीडा

IPL 2022: 'अंडर-19 विश्वचषकातील 2 स्टार लिलावात मालामाल होणार'

हे खेळाडू आयसीसी अंडर-19 विश्वचषकात (Under- 19 World Cup) आपल्या दमदार कामगिरीने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग साठी मेगा लिलाव येत्या काही दिवसांत होणार आहे. या लिलावात सर्व फ्रँचायझी आपले संघ मजबूत करण्याच्या तयारीत आहेत. कोणता खेळाडूवर किती बोली लावली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने अशा दोन खेळाडूंची नावे दिली आहेत जे आयपीएलच्या (IPL 2022) आगामी हंगामाच्या लिलावात फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेऊ शकतात. हे खेळाडू आयसीसी अंडर-19 विश्वचषकात (Under- 19 World Cup) आपल्या दमदार कामगिरीने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

अश्विनने नाव दिलेले दोन खेळाडू म्हणजे भारताचा यश धुल, राजवर्धन हुंगरगेकर. भारताने अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने गतविजेत्या बांगलादेशचा पराभव करत अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसवरही भाष्य केले आहे. या विश्वचषकात ब्रेव्हिसने आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतले. त्याला बेबी एबी डिव्हिलियर्स म्हटले जात आहे.

इशांत शर्माशी तुलना

अश्विनने भारताचा युवा गोलंदाज राजवर्धन हुंगरगेकरची तुलना इशांत शर्माशी (Ishant Sharma) केली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला, 'या खेळाडूला आयपीएल लिलावात नक्कीच खरेदी केले जाईल. कोणती फ्रेंचायझी हे सांगता येणार नाही. राजवर्धन हुंगरगेकर असे या खेळाडूचे नाव आहे. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे जो चांगला इनस्विंग टाकू शकतो. सध्याच्या खेळाडूंमध्ये पाहिले तर इशांत शर्मा हा एकमेव खेळाडू आहे जो इनस्विंग गोलंदाजी करु शकतो. इनस्विंगमुळे फलंदाजांना त्रास होतो आणि त्यामुळे मला वाटते की त्यांना मागणी असेल.

यश धुलला खरेदी करणार

अश्विनने भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुलबद्दल सांगितले की, “यश धुल हा खूप प्रतिभावान फलंदाज आहे. प्रियम गर्गला सनरायझर्स हैदराबादने मागच्या वेळी विकत घेतले होते. यावेळीही ते असेच करतील का? 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वी शॉलाही दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले होते.

ब्रेव्हिस अडचणीत येऊ शकतो

ब्रेविसबद्दल अश्विन म्हणाला, “ब्रेविसला बेबी एबी नावाने खूप प्रमोट केले गेले आहे. तो शानदार खेळत आहे. लोक त्याच्याबद्दल विचारू लागले की त्याची आयपीएलमध्ये निवड होणार का? पण प्रत्येक संघात फक्त आठ परदेशी खेळाडू आहेत. अंडर-19 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूला ते ही जागा देणार का, हा मोठा प्रश्न फ्रँचायजींसमोर आहे. त्यामुळे त्याची निवड होईल असे मला वाटत नाही.”

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

SCROLL FOR NEXT