Sri Lanka World Cup captain arrest news : १९९६ मध्ये श्रीलंकेला क्रिकेटचा वनडे विश्वचषक जिंकून देणारा माजी करणधार अर्जुन रणतुंगावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. श्रीलंकेत त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलेय. या प्रकारानंतर श्रीलंकेच्या राजकीय अन् क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका रणतुंगा यांच्यावर ठेवण्यात आलाय. रणतुंगा आणि त्यांच्या भावावर तेल खरेदी करार देण्याच्या प्रक्रियेत बदल केल्याचा आणि त्याऐवजी जास्त किमतीत स्पॉट खरेदी केल्याचा आरोप आहे.
अर्जुन रणतुंगा याने श्रीलंका सरकारमध्ये पेट्रोलियम उद्योगमंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. पण आता त्याच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात येत आहे. भाऊ दम्मिका रणतुंगा हा घोटाळ्यात दोषी आढळलाय. अर्जुन रणतुंगा मंत्री होता, त्यावेळी दम्मिका सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा अध्यक्ष होता. दम्मिकाला पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी अटक केली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. सध्या तो जामीनावर बाहेर आलेला आहे. श्रीलंका पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दम्मिका याला श्रीलंकेबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
अर्जुन रणतुंगा सध्या श्रीलंकेत नाही, तो परदेशात आहे. तो देशात परतल्यानंतर अटक करण्यात येईल, असे आयोगाने कोलंबो मॅजिस्ट्रेट असांगा बोडारागामा यांच्यासमोर सांगितले. अर्जुन यांचा मोठे भाऊ, धम्मिका रणतुंगा हे त्यावेळी सरकारी पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. भ्रष्ट्राचार प्रकरणात सोमवारी त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याचेही कोर्टात सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे.
कच्च्या तेलाच्या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी ६३ वर्षीय दम्मिका यांची चौकशी करण्यात येत आहे. दम्मिकांच्या हस्तक्षेपामुळे सीपीसीला ८० कोटी श्रीलंकाई रुपयांचे नुकसान झाले. अर्जुन रणतुंगा हे या प्रकरणातील दुसरे आरोपी आहेत. ते सध्या श्रीलंकेच्या बाहेर आहेत. ते मायदेशी परतल्यानंतर अटकेची कारवाई होईल, असे कार्टात सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.