Rahu Mangal Yuti 2024 Saam Tv
आध्यात्मिक

Rahu Mangal Yuti: राहू-मंगळ युतीमुळे ५ राशींना होईल फायदा; जुळून येतील लग्नाचे योग

Rahu Mangal Yuti 2024: राहू आणि मंगळाची जोडी १२ पैकी ५ राशींसाठी लाभदायी ठरू शकते. या राशींमधील लोकांना आर्थिक लाभही मिळू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाने २३ एप्रिल २०२४ रोजी मीन राशीत प्रवेश केलाय. येथे राहु आधीच उपस्थित आहे. मंगळ ग्रहाच्या राशी बदलामुळे मीन राशीत राहू आणि मंगळाचा संयोग झालाय. ही युती ३१ मे २०२४ पर्यंत राहील. दरम्यान या संयोगामुळे ५ राशींना फायदा होणार आहे, आज त्या राशींविषयी माहिती घेऊ.

मीन

राहू आणि मंगळाचा संयोग मीन राशीत झालाय. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना या संयोगाचा सर्वाधिक फायदा होईल. नशिबाने साथ दिल्याने करिअरमध्ये प्रगती होईल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. लहान भाऊ-बहिणीचे लग्नही निश्चित होऊ शकते.

मकर

राहू आणि मंगळाच्या संयोगाचा मकर राशींमधील लोकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. या संयोगामुळे लोकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. व्यवसायात लवकरच चांगला फायदा होऊ शकतो. आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.

मेष

या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा संयोग लाभ देणारा असेल. परंतु या राशींमधील लोकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यानं भविष्यात पैशांची कमतरता टाळता येईल. धार्मिक कामासाठी काही लोकांना प्रवास योग येण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचा खटला न्यायालयात चालू आहे त्यांच्यासाठी आनंदाची बाब याकाळात घडले. ज्यांचा दीर्घकाळा पासून खटला चालू असेल त्यांना आनंदाची बाब कळेल. दीर्घकाळ चालू असलेल्या न्यायालयीन खटल्यातून तुम्हाला दिलासा मिळेल. शत्रूंचा नाश होऊ शकतो. घरात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह

या संयोगाने सिहं राशीतील अनेकांची आर्थिक स्थिती सुधरण्याची शक्यता आहे. जे लोक आजारी असतील त्यांची तब्येत सुधारू शकते. अनेकाच्या प्रकृतीत सुधारणा या काळात होईल. या राशीमधील काही लोक आपल्या कुटुंबियांसोबत पुढील आठवड्यापर्यंत बाहेर जाऊ शकता. या राशीतील काही लोकांना त्यांच्या नोकरीत आनंदाची बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी त्यांना पदोन्नती होऊ शकते. जे लोक व्यवसाय करत आहेत. त्यांच्यासाठीही हा संयोग लाभकारी असेल. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार व्यवसायात भरभराट होईल.

कुंभ

या संयोगामुळे कुंभ राशींमधील लोकांसुद्धा फायदा होणार आहे. जे लोक अडचणीत असतील त्यांना उपाय मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्याचे लग्न निश्चित होऊ शकते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात! जांभुळवाडी दरी पुलाजवळ दोन ट्रेलरची धडक

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

SCROLL FOR NEXT