Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Zodiac Signs: गरज आणि स्वार्थामुळे नाती तयार होतात, तर भावनिक दुखापत आणि अहंकारामुळेही मनं तुटतात. ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीच्या स्वभावावर राशीचा सर्वाधिक प्रभाव पडत असतो. चला जाणून घेऊया, कोणत्या राशीच्या व्यक्ती ब्रेकअप करण्यात पटाईत असतात
Zodiac Signs
Zodiac SignsSaam Tv

आजकाल नाती जुडण्यापेक्षा नाती तुटण्याचा वेग जास्त आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीमध्ये काही आंतरिक गुण आणि मूलभूत प्रवृत्ती असतात. राशींमधील लोक असतात त्यांच्यातील गुण आणि दोषांच्या आधारे ते ब्रेक करणारे आहेत नाही याची ओळखली जात असतात. चला जाणून घेऊया त्या ५ राशींबद्दल जे कोणाचेही ब्रेकअप करताना विचारदेखील करत नाहीत.

सिंह राशी

सिंह राशीचे लोक उत्कृष्ट नेते असतात. धाडस आणि आत्मविश्वास या गुणांसोबतच त्यांच्यात प्रचंड अहंकार, हट्टीपणा आणि आक्रमकताही असते. तसेच ते खूप आत्मकेंद्रित असतात. त्यांच्या आवेशात असतात तेव्हा कोणाचा विचारदेखील करत नाहीत. मग कोणाच्या भावना दुखावल्या किंवा कोणाच्या मनाला ठेच लागली त्याचा ते विचारदेखील करत नाहीत.

कन्या

कन्या राशीचे लोक भावनिक, मेहनती, व्यावहारिक आणि तार्किक असतात. पण ते नाटकीय, टीकात्मक आणि अंतर्मुखही असतात हे लक्षात घ्या. या राशीमधील लोक त्याचा अपमान, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते कधीच विसरत नाहीत. ते सर्वांसमोर अतिशय नाट्यमयरीत्या एखाद्यासोबत सहज ब्रेकअप करू शकतात.

कर्क

कर्क राशीचे लोक सर्जनशील, काल्पनिक, भावनिक, संवेदनशील, संशयास्पद आणि मूडी असतात. तसेच ते दोन स्वभावाचे असतात. म्हणजे ते एकाच वेळी रहस्यमय आणि संरक्षणात्मक असू पद्धतीने वागत असतात. त्यांची सर्जनशीलता आणि भावनिकता त्यांच्या अहंकाराला खूप वाढवते. त्यांच्या अहंकारासमोर कोणाच्याही भावनांना ते तुच्छ समजत असतात. जर त्यांच्या अहंकाराला ठेच लागली तर ते लागलीच नातं तोडून टाकत असतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीतील लोक धाडसी, दृढनिश्चयी आणि सर्जनशील असतात, परंतु ते मत्सर, संधीसाधू आणि हट्टीदेखील हे लक्षात ठेवा. या राशीतील लोक त्यांचा बदला घेण्यावर विश्वास ठेवतात. एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तर तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी ते लोकांच्या भावना दुखावण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

मकर

मकर राशीचे लोक त्यांच्या संयम, रणनीती आणि शिस्तीसाठी ओळखले जात असले तरी त्यांच्यात क्षमाशील स्वभाव अजिबात नसतो. यांना सर्व राशींपैकी सर्वात भावनाशून्य असे म्हटले जाते. यांचा हृदयाशी काहीही संबंध नसतो. सहज नाती तोडून टाकत असतात. हे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही संबंधांना हानी पोहोचवू शकतात.

ज्योतिषशास्त्रात गुणांच्या आधारे राशींची सत्व, रजस आणि तमस्त विभागणी केलीय. या मूलतत्वाच्या आधारे त्याचे वर्गीकरण पृथ्वी, जल, अग्नी आणि वायूमध्ये केले आहे आणि निसर्गाच्या आधारे त्याचे परिवर्तनशील, स्थिर आणि द्वैत स्वरूप असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ग्रहांच्या शुभ आणि अशुभ प्रभावामुळे राशींचे गुण, अवगुण आणि प्रवृत्तीत बदल होत असतो.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com