Rahu Gochar In Meen 
आध्यात्मिक

Rahu Gochar: राहू ग्रह २०२५ पर्यंत 'या' राशींवर असेल खूश; मिळेल अफाट पैसा अन् सन्मान

Rahu Gochar In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू ग्रह वर्ष २०२५ पर्यंत मीन राशीत प्रवेश करतील. यामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे.

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषात राहू ग्रहाला मायावी ग्रह मानले जाते. यात साधारण १८ महिन्यानंतर राशी परिवर्तन करत असतात. वर्ष २०२५ च्या मध्यापर्यंत राहू ग्रह गुरू ग्रहाचं स्वामित्व असलेली राशी म्हणजेच मीन राशीत प्रवेश करतील. यामुळे त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर पडणार आहे. परंतु अशा तीन राशी आहेत, ज्याचं नशीब सर्वाधिक उजळणार आहे. या राशीच्या जातकांना मोठा धनलाभ होणार असून त्यांचा मान-सन्मान देखील वाढणार आहे.

मकर राशी

मकर राशीमधील जातकांना राहू ग्रहाचे हे गोचर म्हणजेच संक्रमण खूप लाभदायी ठरणार आहे. कारण राहू ग्रह मकर राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीमधील जातकांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा या काळात होणार आहे. तर नोकरदार वर्गातील लोकांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यांची आर्थिक भरभराट होणार आहे. ज्यांना नोकरी बदलायची आहे, त्याच्यासाठी हा काळ चांगला आहे.

कुंभ

कुंभ राशींसाठीही राहू ग्रहाचे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. कारण राहू ग्रह तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणी घरावर भ्रमण करणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. या राशींमधील काही जातक जे मार्केटिंगचा व्यवसाय करतात हा काळ चांगला असेल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दे दिवस फायदेशीर ठरतील. तसेच या काळात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. तसेच त्यांच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल. ज्यामुळे लोक प्रभावित होतील.

मिथुन

राहू ग्रहाचे संक्रमण मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण राहू ग्रह तुमच्या राशीतून करिअर आणि बिझनेसच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहील. राहू ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यवसायात मोठी प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. तसेच तुम्ही जर पैसा गुतंवला असेल तर याकाळात तुम्हाला त्याचा मोठा फायदा होईल. या राशीतील अनेक जातकांना त्यांच्या वडिलांचे सहकार्य मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना चांगले यश मिळू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

SCROLL FOR NEXT