Sanjay Rathod - Anil Deshmukh- Uddhav Thackeray
Sanjay Rathod - Anil Deshmukh- Uddhav Thackeray 
सरकारनामा

ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांची दीड वर्षात विकेट!

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambirsingh) यांनी केलेल्या आरोपांची १५ दिवसांत चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायलयाने सोमवारी (ता. ५ एप्रिल) सकाळी सीबीआयला दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) तातडीने आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे दिला. ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट अवघ्या दीड वर्षात पडली आहे. Second Minister in Uddhav Thackeray Government Resigned Today

देशमुख यांच्या आधी टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणाने अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना वन राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता देशमुख यांना परमबीरसिंग यांच्या गंभीर आरोपानंतर राजीनामा देणे भाग पडले आहे. राठोड यांच्यावर बीडमधील पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोप झाला. त्यांनी या प्रकरणी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले होते. मात्र, राजकीय दबाव वाढल्यामुळे  राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला.

दरम्यान, आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे, उद्या शिवसेनेचे अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी होईल, या शिवाय मनी लाॅन्ड्रींग, ड्ग्ज, बदल्या, बुकी यांच्या माध्यमातून झालेल्या दोन हजार कोटींची वसुली सीबीआय, इन्कमटॅक्स किंवा अन्य कुणाकडून निश्चित होईल. तेव्हा ठाकरे सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांना घरी बसावे लागेल, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी आज देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर केला. Second Minister in Uddhav Thackeray Government Resigned Today

दरम्यान, देशमुखांचा राजीनामा अपरिहार्यच होता. त्यामुळे देशमुख या प्रकरणात नैतिकतेचा आव आणत असले तरी, त्यांनी ही नैतिकता आधीच दाखवायला हवी होती. अद्यापही यावर मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे नैतीकता आहे काय हाच गंभीर प्रश्न आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी म्हटले आहे. 
Edited By- Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT