Marathi News - bjpùs Operqtion lotus like karnataka
Marathi News - bjpùs Operqtion lotus like karnataka 
सरकारनामा

भाजपचं कर्नाटकसारखं महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस, या नेत्यांना दिली जबाबदारी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात भाजपनं ऑपरेशन लोटस सुरु केलंय. विशेष म्हणजे  ऑपरेशन लोटसची विशेष जबाबदारी चार आयात नेत्यांना देण्यात आलीय. नारायण राणे,गणेश नाईक,विखे पाटील,बबनराव पाचपुते यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. साम टीव्हीला सूत्रांकडून ही माहिती मिळतंय.

'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार विश्वासदर्शक ठराव संमत करेल, याचा मला विश्वास आहे. आम्ही लवकरच बहुमत सिद्ध करू आणि हेच ऑपरेशन फडणवीस-पवार आहे,' असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. 

शनिवार सकाळपासून सुरू झालेल्या राजकीय वादंगामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक वसंत स्मृती दादर येथे पार पडली. या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी बबनराव लोणीकर आणि बबनराव पाचपुते उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, 'महायुतीला दिलेला जनादेश हा सुस्पष्ट असून 180 जागांवर होता. मात्र, आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने याची हेटाळणी केली. गेल्या 20 वर्षांपासून महायुतीच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली, याचा उल्लेख उपस्थित आमदारांनी केला. तसेच फडणवीस आणि पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सर्व आमदारांनी बैठकीत संमत करण्यात आला असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.

शनिवारी  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे एकत्र आल्यामुळे पक्षात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. आता समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे जाणार आहे.

भाजपच्या आमदारांना कुठेही ठेवण्याची गरज नाही. कारण आमच्या नेत्यांचा आणि आमदारांचा एकमेकांवर विश्वास आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना स्वत:च्या आमदारांवर विश्वास नाही. ते काय विश्वासदर्शक सरकार आणणार? सोनिया गांधींशी शिवसेनेने केलेली सलगी हा गोराबाजार आणि आम्ही अजित पवार यांच्याशी केलेली सलगी हा काळाबाजार असा कसे म्हणता? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Web Title: BJP leader Ashish Shelar comment about BJP MLA meeting held in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

SCROLL FOR NEXT