Ganesh Chaturthi 2022  Saam Tv
धार्मिक

Ganesh Chaturthi 2022 : गणेशाला २१ दुर्वा का वाहिल्या जातात ? जाणून घ्या त्यामागची कथा

गणपतीला दुर्वा अर्पण करण्यामागील पौराणिक कथा

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi 2022 : आजपासून घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा आता घराघरात विराजमान होतील. अशी मान्यता आहे की, गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं समाप्त होतात. सोबतच धन-संपत्ती (Money), बुद्धी, वि​वेक, समृद्धीतही वृद्धी होते.

गणेशाच्या (Ganesh) पूजेत दूर्वाला विशेष मान असतो. त्याशिवाय गणेशाची पूजा संपन्न मानली जात नाही. गणपती हा एकमेव असा देव आहे ज्यांना पूजेत दुर्वा अर्पण केला जातो. चला जाणून घेऊया की गणपतीच्या पूजेत दुर्वा का वापरला जातो? त्याचे इतके महत्त्व का आहे ? त्याशिवाय पूजा पूर्ण का मानली जात नाही.

गणपतीला दुर्वा अर्पण करण्यामागील पौराणिक कथा -

प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक राक्षस होता. त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते. तो इतका भयंकर होता की ऋषी-मुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा. या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनीसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा. तेव्हा महादेवांनी सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनींची प्रार्थना ऐकून घेतली व त्यांनी सांगितले की, अनलासूराचा अंत फक्त गणपतीच करु शकतात.

कथेनुसार जेव्हा गणपतीने अनलासुराला गिळालं तेव्हा त्यांच्या उदरात जळजळ होऊ लागली. अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले. पण, गणपतीच्या उदरात होणारी आग शांत होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली. त्यांनी दुर्वांच्या २१ गाठी बांधल्या आणि श्रीगणेशाला खायला दिल्या. जेव्हा गणपतीने दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हा गणपतीला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरु झाली. गणपतीच्या पूजेत याचं मोठं महत्त्व आहे.

दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही आराम मिळतो. त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे.गणपतीला दुर्वा वाहताना त्यात त्रिदल असलेले पात निवडले जाते. त्याची जुडी सुटू नये म्हणून त्याला दोऱ्याने बांधले जाते. अशा २१ जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वांची कंठी घातली जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT