Mangalagauri Vrat 2024 
धार्मिक

Mangala Gauri Poojan: काय आहे मंगळागौरीचे व्रत? श्रावण महिन्यात का केलं जातं? जाणून घ्या

Mangala gauri Vrat 2024: श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्यास महत्त्व आहे. श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. काय आहे मंगळागौरीचे व्रत? जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदूधर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिन्यात महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यंदा ४ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी अनेकजण महादेवाचं व्रत करतात. श्रावणी सोमवारी महादेवाला जलाभिषेक करून नैवेद्य दाखवला जातो. श्रावणात मांसाहार तसेच तामसिक पदार्थ खाण्यास मनाई असते.

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी महिला मंगळागैरीचे व्रत केले जाते. मंगळागौरीचे व्रत वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती आणि तुमच्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी केले जाते. अविवाहित महिला मंगलागौरीचे व्रत चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी करतात. या व्रतदरम्यान माता पार्वतीची पूजा केली जाते. श्रावणातील मंगळवारी सकाळी स्वच्छ स्नान करून तुळशीमध्ये दिवा लावावा त्यानंतर देवाची पूजा करून "कर्पूर गौरम करुणावतारम् संसारा सारम भुजगेंद्रहरम. सदा बसंत हृदयविंदे भवन भवानीसहित नमामि।" या मंत्राचा जप केला पाहिजे. पूजा करताना देवासमोर तूपाचा दिवा आणि धूप लावा. ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल. पूजा करतांना दुर्गा मंत्रचा देखील जप करू शकता.

मंगळागौरीची पूजा करताना काय काळजी घ्यावी?

घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून मंगळागौरीचे व्रत केले जाते. श्रावणातील मंगळवारी तुमच्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमच्या घरातील तुटलेल्या वस्तू फेकून द्यावे. ज्योतिशास्त्रानुसार, नवविवाहित महिलांनी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना सौभाग्याची प्राप्ती होते. यंदा मंगळागौरी ६ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

मंगळागौरीच्या पूजे दरम्याण या मंत्रांचे जप करा:

1) सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते॥

2) या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता |

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

3) ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT