Shravan 2024: श्रावणात दिवसानुसार शिवलिंगावर अर्पण करा 'या' गोष्टी; मजबूत होईल नवग्रह, मिळेल पदोन्नती आणि भरपूर पैसा

Shravan 2024: भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार श्रावणात रोज शिवलिंगावर काही विशेष गोष्टी अर्पण केल्याने नवग्रहांची स्थिती मजबूत होते.
Shravan 2024: श्रावणात दिवसानुसार शिवलिंगावर अर्पण करा 'या' गोष्टी; मजबूत होईल नवग्रह, मिळेल पदोन्नती आणि भरपूर पैसा
Shravan 2024
Published On

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शिव आणि शिवलिंगाची पूजा केल्याने साधकाला महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी 22 जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत श्रावण व्रत पाळले जाणार आहे. तर महाराष्ट्रात आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालीय.

या काळात शिवलिंगाला दिवसानुसार काही खास गोष्टी अर्पण केल्याने कुंडलीतील नवग्रहांची स्थिती मजबूत होऊ शकते. प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करत असतो. अशा परिस्थितीत प्रत्येक ग्रहाला काही उपायांचा अवलंब करून बळ मिळू शकते, ज्यामुळे व्यक्तीचे जीवन आनंदी होऊ शकते. श्रावणातील दिवसानुसार शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करणे शुभ आहे. तसेच महादेवाची पूजा केल्याने कुंडलीतील कोणत्या ग्रहाची स्थिती बळकट होते, हे जाणून घेऊ.

सोमवार

सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध, गंगाजल, तांदूळ, पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करणे शुभ असते. यामुळे कुंडलीतील चंद्र ग्रह बलवान होतो, त्यामुळे साधकाला प्रत्येक कामात यश मिळते. तसेच मन शांत राहते.

आठवड्याचा दुसरा वार मंगळवार

मंगळवारी शिवलिंगावर मध आणि गूळ अर्पण केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो. यामुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो. तसेच समस्यांशी लढण्याची ताकदही मिळते. याशिवाय या दिवशी शिवलिंगावर लाल गुलाल, लाल वस्त्र आणि लाल फुले अर्पण करणं देखील शुभ मानलं जातं.

बुधवार

जे लोक बुधवारी शिवलिंगावर बेलची पाने आणि हिरवे हरभरे अर्पण करतात, त्यांच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान होत असतो. अख्ख्या मुगाच्या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी शिवलिंगाला हिरवे कपडे, हिरवी फुले आणि सुपारी अर्पण करू शकता. त्यामुळे करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. तसेच समाजात आणि कुटुंबातही सन्मान वाढत असतो.

गुरुवार

गुरुवारी शिवलिंगावर हरभरा डाळ आणि पिवळे चंदन अर्पण केल्याने गुरु ग्रह बलवान होतो. यामुळे साधकाचे ज्ञान वाढते आणि वैवाहिक जीवनात शांतता टिकून राहते. या दिवशी शिवलिंगावर हळद, पिवळे वस्त्र, पिवळी फुले आणि हरभरा डाळही अर्पण करू शकता.

शुक्रवार

शुक्रवारी शिवलिंगावर गुलाब जल आणि चंदनाचे जल अर्पण करणे शुभ असतं. यादिवशी शिवलिंगावर दही, तांदूळ, पांढरे वस्त्र, पांढरी फुले अर्पण करू शकता. यामुळे कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होत असते. ज्यामुळे जीवनात धन, सुख, शांती, प्रणय आणि आदर कायम राहत असतो.

Shravan 2024: श्रावणात दिवसानुसार शिवलिंगावर अर्पण करा 'या' गोष्टी; मजबूत होईल नवग्रह, मिळेल पदोन्नती आणि भरपूर पैसा
Shahada News: खोदकाम करताना सापडले शिवलिंग, प्राचीन चबुतरा; मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

शनिवार

शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे कपडे आणि उडीद डाळ अर्पण करणे शुभ असते. यामुळे कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते. तसेच व्यक्तीला जीवनात यश मिळते. त्याचबरोबर पैशाशी चणचण देखील दूर होत असते.

रविवार

ज्या लोकांच्या घरात तणावपूर्ण वातावरण असेल त्यांनी रविवारी शिवलिंगाला न मिसळलेले पाणी, लाल चंदन, लाल फुले, गूळ किंवा लाल वस्त्र अर्पण करावे. कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे जीवनातील समस्या कमी होतील.

Shravan 2024: श्रावणात दिवसानुसार शिवलिंगावर अर्पण करा 'या' गोष्टी; मजबूत होईल नवग्रह, मिळेल पदोन्नती आणि भरपूर पैसा
Shiv Mandir of Ambernath: अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने धारण केलं रौद्ररुप! प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्याखाली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com