Shree Gajanan Maharaj Prakat Din saam tv
धार्मिक

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: "गण गण गणात बोते" मंत्राचा करा नेमका अर्थ काय? कधी आहे गजानन महाराज प्रकट दिन? जाणून घ्या सविस्तर

Gajanan Maharaj Mantra: महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातही ज्यांचे भक्त आहेत ते म्हणजे शेगावचे गजानन महाराज. यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी, म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी, शेगाव येथे झाला.

Saam Tv

महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातही ज्यांचे भक्त आहेत ते म्हणजे शेगावचे गजानन महाराज. यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी, म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी, शेगाव येथे झाला. याच ठिकाणी गजानन महाराज प्रथम प्रकट झाले. त्यांच्या आगमनानंतर, त्यांनी सुमारे ३२ वर्षे भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांचा "गण गण गणात बोते" हा मंत्र विशेष प्रसिद्ध आहे. मात्र या जपाचा अर्थ बऱ्याच भक्तांना माहित नाही.

यंदा २० फेब्रुवारीला रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. हा दिवस गुरुवारी आल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानला जाणार आहे. या दिवशी गजानन महाराजांचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्रांचा जप, विशेष पूजन लाभदायक आणि पुण्य फलदायी मानले जाते. याच जपाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत.

'गण गण गणात बोते' या मंत्राचा अर्थ काय?

गजानन महाराज त्यांच्या काळी कोणत्याही घटना सांगताना त्याचे स्पष्टीकरण द्यायचे. हे महाराज अंतर्ज्ञानी होते. तर त्यांचा मंत्र 'गण गण गणात बोते' हा होता. याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.

पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव.

गणात म्हणजे हृदयात.

बोते म्हणजे बघा.

प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका.

तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे.

कोणताही प्राणी देवापासून वेगळा नाही.

देव सर्वांमध्ये आहे आणि सर्व देवामध्ये आहेत.

देव प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टींमध्ये उपस्थित आहे.

'गण गण गणात बोते' हा अर्थ लक्षात घेतला तर तुम्हाला समजेल की, ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीत कोणाशीच वाईट वागत नाही. तसे बोलत सुद्धा नाही. शिवाय कोणतेही वाईट कृत्य करत नाही. तर या अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे आहे. ही जाणीव ह्रद्यात नित् होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी, म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून यशाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते, असे म्हटले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT