Shardiya Navratri 2022 Saam Tv
धार्मिक

Shardiya Navratri 2022 : ज्योतिष्यशास्त्रानुसार नवरात्रीच्या 'या' दिवशी साजरी करा विजयादशमी

विश्वभूषण लिमये

सोलापूर : कोरानाकाळानंतर यंदाचा नवरात्रौत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शारदीय नवरात्र ही यंदा २६ सप्टेंबपासून सुरु झाली असून ५ ऑक्टोबर रोजी त्याची सांगता होईल.

कालच्या घटस्थापनेनंतर नवरात्र (Navarati) उत्सवला सुरुवात झाली आहे. यंदा ३० सप्टेंबरला ललिता पंचमी असून २ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. ३ ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा आहे. ४ ऑक्टोबरला नवरात्रौत्थापन (नवरात्र समाप्ति) आहे व ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे.

सर्वसाधारणपणे नवरात्रीची नवव्या माळे दिवशी नवदुर्गेचे विसर्जन केले जाते, परंतु यंदा दहाव्या दिवशी विजयादशमीला येत आहे. मात्र या वेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रौत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९दिवस किंवा १० दिवसांचा कालावधी आहे. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो या वर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी नवरात्रौत्थापना आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसरा १० व्या दिवशी साजरा केला जाणार असल्याची माहिती सोलापुरातील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

ज्या भाविकांना २६ सप्टेंबर रोजी घटस्थापना करणे शक्य झाले नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) २८ सप्टेंबर, ३० सप्टेंबर, २ ऑक्टोबर किंवा ३ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी आणि ४ ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्थापन करावे. असे मोहन दाते यांनी सांगितले.

विजया दशमी, दसरा (Dasara), सीमोल्लंघन हा उत्सव ५ ऑक्टोबर रोजी आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या आयुष्यात नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.२६ ते ३.३१ या दरम्यान आहे. अशी माहिती दाते पंचांगकर्ते यांनी दिली आहे.

नवरात्रातील महत्वाचे दिवस-

२६ सप्टेंबर – घटस्थापना

३० सप्टेंबर – ललिता पंचमी

२ ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)

३ ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास

४ ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना

५ ऑक्टोबर – विजया दशमी (दसरा)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT