Pitru Paksha 2022 Saam TV
धार्मिक

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात पिंडदान करायचे आहे ? तर भारतातील 'या' प्रसिध्द ठिकाणी करा, मिळेल पितरांना मोक्ष

हिंदू धर्मात, पिंडदान हा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मुक्तीसाठी मुख्य विधी मानला जातो, आजपासून नाही तर अनंत काळापासून.

कोमल दामुद्रे

Pitru Paksha 2022 : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यंदा हा १० सप्टेंबरपासून सुरु झाला असून २५ सप्टेंबर पर्यंत चालेल. असे मानले जाते, या दिवसात आपले पूर्वज पृथ्वी तलावर येतात व आपल्या आशिर्वाद देतात. या दिवसात पितरांचे अनेक कार्य केले जाते.

हिंदू धर्मात, पिंडदान हा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मुक्तीसाठी मुख्य विधी मानला जातो, आजपासून नाही तर अनंत काळापासून. या वर्षी श्राद्ध पक्ष म्हणजेच पिंडदान १० सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २५ सप्टेंबरपर्यंत चालेल.

या विशेष प्रसंगी, करोडो लोक पिंडदानसाठी भारताच्या विविध भागांमध्ये जातात. पण अनेकजण अशी जागाही शोधतात जिथे पिंडदान केल्याने एक नव्हे तर दहापट पुण्य प्राप्त होते. त्याविषयी जाणून घेऊया

१. हरिद्वार -

गंगेच्या काठावर वसलेले हरिद्वार हे एक सुंदर शहर आहे तसेच एक पवित्र धार्मिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते. दररोज हजारो भाविक येथे भगवंताचे दर्शन घेण्यासाठी येतात. येथे गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात, असे मानले जाते. याठिकाणी कोणाचे अंतिम संस्कार झाले किंवा पितरांचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय आत्मा स्वर्गात पोहोचतो असे मानले जाते. असे म्हटले जाते की, पिंडदानासाठी येथे अनेक समारंभ आयोजित केले जातात.

२. प्रयागराज -

गंगा-यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमाच्या काठावर वसलेले, प्रयागराज हे पिंडदान करण्यासाठी एक पवित्र स्थान आहे. नद्यांच्या संगमावर आपल्या पूर्वजांचे दान करणाऱ्याला एकपट नव्हे तर दहापट पुण्य प्राप्त होते, अशी या स्थानाबद्दल श्रद्धा आहे.

दुसरी श्रद्धा अशी आहे की येथे असलेल्या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने जीवनातील सर्व पापे आपोआप धुऊन जातात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला प्रयागराजला जाऊन आपली पाप व पिंडदान करायचे असेल तर तुम्ही त्रिवेणी संगम समुद्रकिनारी जाऊ शकता.

३. बोधगया -

बिहारमधील कोणतेही ठिकाण पिंडदानासाठी प्रसिद्ध आणि पवित्र मानले जात असेल तर त्याचे नाव बोधगया आहे. या जागेचा उल्लेख रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये गयापुरी असा केला आहे.

बिहारमधील जवळपास सर्व लोक पिंडदानसाठी बोधगयाला पोहोचतात. येथे २० हून अधिक ठिकाणी पिंडदान कार्य केले जाते. येथील पिंडदान केल्यानंतर महाबोधी मंदिर, ब्रह्मयोनी टेकडी आदी अनेक ठिकाणी जाऊन दर्शन घेता येते.

४. वाराणसी

वाराणसी हे उत्तरप्रदेश तसेच भारतातील (India) सर्वात पवित्र शहर मानले जाते. या शहरात दररोज लाखो भाविक प्रभूच्या दर्शनासाठी आणि अंत्यदर्शनासाठी येतात. येथे पिंडदान केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचा आत्मा स्वर्गात पोहोचतो अशी मान्यता आहे. याशिवाय येथील गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात. पिंडदानासाठी येथे धार्मिक विधीही आयोजित केले जातात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT