Pitru Paksha 2022  Saam Tv
धार्मिक

Pitru Paksha 2022 : तुमच्या पूर्वजांचे नाव माहित नाही ? तर, या पध्दतीने पितृपक्षात व्हा त्यांना श्रध्दांजली

अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरु होतो. या महिन्यात पितरांचे श्राध्द व त्यांचे धार्मिक कार्य केले जाते.

कोमल दामुद्रे

Pitru Paksha 2022 : अनंत चतुर्दशी (Anant Chaturdarshi) झाल्यानंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरु होतो. या महिन्यात पितरांचे श्राध्द व त्यांचे धार्मिक कार्य केले जाते. यंदा हा दिवस १० सप्टेंबरपासून सुरु झाला आहे.

पितृपक्षात पितरांचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली जाते. तसेच या पंधरा दिवसात आपले पूर्वज पृथ्वी तलावर येतात असा समज देखील आहे. पितृपक्षात आपल्या पूर्वजनांना आपल्याला खुश करायचे असते. या महिन्यात ते आपल्याला आशिर्वाद देतात व अनेक वाईट गोष्टींपासून आपले संरक्षण देखील होते अशी मान्यता आहे.

या महिन्यात आपल्याला आपल्या पूर्वजांचे श्राध्द घालयाचे असते किंवा त्यांना श्रध्दाजंली वाहायची असते. पण ज्यांना त्यांच्या पूर्वजांचे नाव माहित नाही त्यांनी कृतज्ञता कशी व्यक्त करावी ते जाणून घेऊया-

पितृपक्षाचे वर्णन रामायण आणि महाभारतात आढळते. यासोबतच पितृपक्षाचे महत्त्व पौराणिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. यामुळेच पितृपक्षात कठोर शिस्तीचे पालन केल्याने व्यक्ती आपल्या पूर्वजांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करतात. पितृपक्ष हा पूर्णपणे पितरांना समर्पित आहे. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

- यावेळी पितृ पक्षाच्या पहिल्या दिवशी विशेष योगायोग होत आहे

यावेळी पितृ पक्षात विशेष योग आहे. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी प्रतिपदा आणि पौर्णिमा श्राद्ध १० सप्टेंबर २०२२ रोजी पितृ पक्षात एकत्र होणार आहे. यावर्षी १६ दिवस श्राद्ध होणार आहे. सप्तमी श्राद्ध १६ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे. १७ सप्टेंबरला तिथी गेल्यामुळे या दिवशी पितरांचे श्राद्ध केले जाणार नाही. १८ सप्टेंबर २०२२ रोजी अष्टमी श्राद्ध होईल.

- या गोष्टी केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.

पौराणिक ग्रंथानुसार पितृपक्षातील पितरांच्या मृत्युतिथीला पिंडदान, तर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. दुसरीकडे, जर तुम्हाला तारीख माहित नसेल, तर तुम्ही महालय अमावस्या (सर्व पितृ अमावस्या २०२२) रोजी श्राद्ध करू शकता. तसेच, आपल्या पितरांच्या मृत्यू तिथीला येणाऱ्या दिवशी देखील आपण त्याचे श्राध्द करु शकतो.

पूर्वजांचे नाव माहीत नसेल तर?

पूर्वजांचे नाव माहीत नसेल तर त्याचे विधानही शास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षात पितृलोकातून पितर पृथ्वीवर येतात. जर तुम्हाला पूर्वजांची नावे माहित नसतील तर तुम्ही 'अंतरिक्ष' हा शब्द उच्चारू शकता. आपण हा शब्द उच्चारून पूर्वजांना श्रद्धांजली देखील देऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT