Saturday Solution : शनिवारी करा 'हे' उपाय, बिघडलेले ग्रह होतील पुन्हा सुरळीत

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. त्याला सामोरे जाणे कधी कधी आपल्याला खूप त्रासदायक असते.
Saturday Solution
Saturday SolutionSaam Tv
Published On

Saturday Solution : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. त्याला सामोरे जाणे कधी कधी आपल्याला खूप त्रासदायक असते. काही वेळेस या अडचणी आपल्या ग्रहमानानुसार येतात व त्यामुळे देखील आपल्याला त्याचा त्रास होऊ लागतो.

शनिवार (Saturday) हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा विधीपूर्वक केली जाते. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात.

Saturday Solution
Kalki Jayanti 2022 : श्री हरीचा शेवटचा अवतार कल्की जाणून घ्या, त्याच्या जयंतीविषयी खास गोष्टी

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. तो लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.

शनिवारी करा हे उपाय -

१. दर शनिवारी पिंपळाची ११ न कापलेली पाने घेऊन त्यांचा हार शनिदेवाला अर्पण करावा. पुष्पहार अर्पण करताना 'ओम श्रीं शं शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करत रहा. त्यामुळे सर्व अडचणी दूर होतील.

२. शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा. प्रदक्षिणा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे. असे केल्याने प्रगती होईल.

Saturday Solution
Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशीला का केले जाते गणपतीचे विसर्जन, जाणून घ्या

३. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ थोडेसे काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर पिंपळाच्या मुळालाही पाणी अर्पण करावे.

४. शनिवारी एक काळा कोळसा घेऊन वाहत्या पाण्यात टाकावा. तसेच ' ऊँ शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. त्यामुळे नोकरीत (Job) यश मिळेल आणि उत्पन्न वाढेल.

५. शनिवारी पुष्प नक्षत्रात भरपूर पाणी घ्या. त्यात थोडी साखर घाला. हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. तसेच 'ओम ह्रीं श्रीं शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com