Navratri 2022 Saam Tv
धार्मिक

Navratri 2022 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केला जाईल 'हा' खास व्रत, मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

नवरात्रीच्या पाचव्या माळेला आहे हा खास व्रत

कोमल दामुद्रे

Navratri 2022 : शारदीय नवरात्रीचा काळ सुरु झाला असून या दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांना पूजले जाते. या दिवसात देवीची मनोभावे पूजा व अर्चना केली जाते. शारदयी नवरात्रौत्सव सुरु झाला असून उद्या पाचवी माळ आहे.

शारदीय नवरात्रीत (Navratri) पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते. या दिवशी देवी सतीच्या स्वरुपातील ललित देवीची पूजा केली जाते. हिंदू पंचागानुसार ३० सप्टेंबरला ललित पंचमीचे व्रत केले जाईल. या दिवसाला गुजरात व महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक महत्त्व आहे.

शास्त्रानुसार ललित देवीला दहा महाविद्यांपैकी एक मानले जाते. तिला महात्रिपुरसुंदरी, षोडशी, ललिता, लीलावती, लीलामती, ललिताम्बिका, लीलेशी, लीलेश्वरी, ललितागौरीच्या नावाने देखील ओळखले जाते. जाणून घेऊया याचे महत्त्व व पूजा विधी

ललिता पंचमी २०२२ मुहूर्त

ललिता पंचमी व्रताची तारीख: ३० सप्टेंबर २०२२, शुक्रवार

पंचमी तिथी : ३० सप्टेंबर २०२२, शुक्रवारी सकाळी १२.०८ पासून

पंचमी तिथी समाप्ती : ३० सप्टेंबर २०२२ रात्री १०.३४ पर्यंत

अभिजीत मुहूर्त: सकाळी ११.५३ ते दुपारी १२.४१ पर्यंत

ललिता पंचमी व्रत पूजा विधि (Lalita Panchami 2022 Puja Vidhi)

- देवी ललिता यांना समर्पित या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान पूर्ण करा आणि त्यानंतर मंदिरात ललिता पंचमीचे व्रत करा.

- सर्व प्रथम भगवान गणेश, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा आणि नंतर देवी अशोक सुंदरीची पूजा करा.

- तसेच, त्याच्याकडे आपल्यासाठी सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मागा. त्यानंतर माता ललिता यांच्या चित्रासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि माता ललिता सहस्रावलीचा पाठ करा.

- पूजेच्या वेळी ध्यानात ठेवा की तुमचा चेहरा उत्तर दिशेला असावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT