Moola Nakshatra 2025  google
धार्मिक

Moola Nakshatra 2025 : मूळ नक्षत्रावर जन्मलेले लोकं खूप खास असतात! जाणून घ्या त्यांचे स्वभावाचे गुपित

Dhanu Rashi : धनु राशीतील केतूच्या प्रभावाखाली असणाऱ्या मूळ नक्षत्रातील व्यक्तींचा स्वभाव, नोकरी-व्यवसाय, आरोग्याशी संबंधित माहिती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा सखोल आढावा.

Sakshi Sunil Jadhav

मूळ नक्षत्र

धनु राशी केतू या ग्रहाच्या अंमलाखाली येणारे हे नक्षत्र. या व्यक्तीचा स्वभाव उदार, दुसऱ्यांना मान देणे, कायदा नीतीचे पालन करणारी, रूढी परंपरा मानणारे, दृढनिश्चयी कोणत्याही विषयात अगदी मुळापर्यंत जाण्याची आवड, आत्मचिंतनाची सवय, उगाच कोणाच्याही आहारी न जाण्याची वृत्ती असते.

संग्रही वृत्ती कुठल्याही गोष्टीवर विचारांवर वाद घालण्यात माहीर,आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, अहंकारी घमेंडखोर, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची वृत्ती, आनंदी वृत्ती, दुनियाची पर्वा न करता वावरणे, वडील माणसांच्या विरोधात जाऊन कृती करणे शत्रुवर विजय मिळवणे, शिक्षणाची अत्यंत आवड, आई-वडिलांपासून असलेले रोग भोगावे लागतात.

सामाजिक कार्याची आवड असते, जादूटोणा यांवर विश्वास प्राचीन आणि जुन्या गोष्टींची आवड असते. अधिकारी व दुराग्रही असल्यामुळे आयुष्यात काही संधी गमावून बसण्याची वेळ येते. प्रवासाची आवड, फॅशनची आवड नाही. साधी पण उत्तम राहणे असते.

नोकरी व्यवसाय -

पुरोहित, पाद्री, मौलवी, पुराण विश्लेषक, उत्तम टीकाकार, कुत्रे पाळून त्यांची पैदास करून पैसे मिळवणे. जडीबुटीचे औषधाचे विक्रेते, लेखक - भुताचे त्यांच्या गुढ गोष्टी लिहिणारे, संपादक, गुप्तचर विभागात काम करणारे, सल्ला मार्गदर्शन करणारे व्यवसाय, वाडवडिलांचा व्यवसाय करणारे, क्लार्क इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित क्षेत्रात नोकरी व्यवसाय ,lराजकीय नेता, स्पीकर नाडी परीक्षा उत्तम असणारी वैद्य,l घोडेस्वारी, घोड्यांचे पैदास, लष्करी पोलीस दलामध्ये नोकरी, उत्तम खेळाडू असू शकतात.

रोग आजार -

या नक्षत्रात गुप्तांग, गुदद्वार, लिंग, जंघा, कटिभग, फुफ्फुसे हे अवयव येतात. त्यामुळे संधिवात चालण्या फिरण्यास कष्ट, उष्णतेचे विकार, फुफ्फुसाचे विकार, मूळव्याध, कापणे, भाजणे, हाड मोडणे, झाडावरून किंवा उंचावरून पडणे. शस्त्रांच्या जखमा, अपघात, मणके सरकणे हे विकार संभवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT