Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला डाएटमध्ये किंवा वजन कमी करत असताना भात खायची ईच्छा होत असेल तर पचायला हलकी फुलकी रेसिपी एकदा ट्राय करा.
शिजलेला मऊ भात, मीठ, तेल, मोहरी, कढीपत्ता, हळद, नारळाच्या फोडी, लाल मिरच्या, चणाडाळ, धणे, लिंबाचा रस इ.
कढईत तेल गरम करून मोहरी, लाल मिरची, कढीपत्ता आणि चणाडाळ परतून घ्या.
हळद पावडर फोडणीत मिक्स करून घ्या.
आता फोडणीत भात मिक्स करा आणि चवीनुसार मीठ घाला.
संपुर्ण भात ४ मिनिटे छान परतून घ्या.
परतल्यावर भातावर लिंबाचा रस घालून झाकण ठेवा.
भातावर तुम्ही ओल्या नारळाचा किस घालून खाऊ शकता.