Shravan 2022, Horoscope, Astrology
Shravan 2022, Horoscope, Astrology ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

Shravan 2022 : श्रावणात या राशींवर पडेल भगवान शंकराचा प्रभाव, कोणत्या राशीला होईल याचा फायदा?

कोमल दामुद्रे

मुंबई : श्रावण महिना सुरु झाला की, सगळे शंकराची मनोभावे पूजा करतात. शंकराच्या पिंडींचा मनोभावे अभिषेक करुन त्याला बेलाचे पान वाहिले जाते.

हे देखील पहा -

यंदा श्रावण महिन्यात सोमवारच्या व्रताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. यावेळी एकूण चार सोमवार येत आहे. तसेच यावेळी श्रावण महिन्यात अनेक शुभ योग देखील येत आहे. भगवान शंकराच्या उपासनेचे महत्त्व अधिकच वाढेल. या वेळी भगवान शिव (Lord shiva) कोणत्या राशींना सर्वात जास्त प्रसन्न करतील. जाणून घेऊया या श्रावणात कोणत्या राशीवर भगवान शंकराचा प्रभाव कसा पडेल.

१. ज्योतिष्यशास्त्रानुसार श्रावण महिना हा मिथुन राशीसाठी अत्यंत लाभकारी आहे. या राशीच्या जातकांना त्याच्या कामात यश मिळेल. धन (Money) लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. दांपत्य जीवनात सुख व समृध्दी लाभेल. श्रावणात महिन्यात भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची देखील पूजा करायला हवी.

२. कर्क राशीच्या जातकासाठी श्रावण महिना अतिशय शुभ मानला आहे. या महिन्यात भगवान शंकराची विशेष कृपा राहिल. कर्जापासून मुक्ती मिळेल. धनात वाढ होईल. जीवनात यशाचे योग बनतील. आई-वडीलांची सेवा केल्याने जीवनात आनंद येईल.

३. या वर्षी श्रावणात तुळा राशीला विशेष फायदा होईल. या महिन्यात आपली अनेक कामे मार्गी लागतील. भाग्यात पुरेपूर त्याचा फायदा होईल. आर्थिक उन्नतीचे योग बनतील. दिलेली उधारी परत मिळेल. नोकरीच्या अनेक नव्या संधी मिळतील.

४. कुंभ राशीच्या जातकांना श्रावण महिन्यात अधिक लाभ होतील. आपण ज्या कामात पाऊल टाकू त्या कामात आपल्याला फळ मिळेल. व्यापारात व करिअर क्षेत्रात उन्नतिचे योग बनतील.

५. मीन राशीला या श्रावणात नशिबाची साथ मिळेल. मित्र परिवार व नात्यात अनेक सहयोग प्राप्त होतील. या महिन्यात आपण नवीन वाहनांची खरेदी करु शकतो. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाचा अभिषेक केल्यास विशेष फळ मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT