ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

कुंडलीतील दुसऱ्या स्थानात हे ग्रह बसले असतील तर होईल धनलाभ

कुंडलीतील १२ स्थानांवर वेगवेगळे ग्रह स्थित असल्यास अनेक योग तयार होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीला अधिक महत्त्व दिले जाते. कुंडलीतील १२ स्थानांवर वेगवेगळे ग्रह स्थित असल्यास अनेक योग तयार होतात.

हे देखील पहा-

कुंडलीत निर्माण होणारे ग्रह आणि योगांद्वारे व्यक्तीचे वर्तमान आणि भविष्य कसे असेल हे कळते. माणसाच्या आयुष्यात किती सुख-दु:ख असेल आणि पैशाची स्थिती काय असेल. कुंडलीतील दुसरे स्थान हे धनस्थान आहे. यात बसणारे कोणते ग्रह शुभ असतात व यावर कोणत्या अशुभ ग्रहांची दृष्टी असते हे जाणून घेऊया

१. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील दुसऱ्या स्थानात एखादा शुभ ग्रह असेल किंवा त्याची दृष्टी शुभ असल्यास अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही व प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळते.

२. कुंडलीतील दुसऱ्या स्थानात बुध ग्रह स्थित असल्यास त्यावर चंद्राची दृष्टी असेल तर ते अशुभ मानले जाते. अशावेळी व्यक्तीला खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. यासोबतच पैसे जमवताना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

३. व्यक्तीच्या कुंडलीत दुसऱ्या स्थानात चंद्र असेल हे शुभ मानले जाते. अशा व्यक्तीला कठोर परिश्रम केल्यानंतर चांगले यश मिळते आणि भौतिक सुखांचा आनंद घेता येतो.

४. कुंडलीतील दुसऱ्या स्थानात अशुभ ग्रह स्थित असेल तर ही स्थिती व्यक्तीसाठी खूप हानिकारक असते. अशा व्यक्तीला खूप मेहनत करूनही फारसे चांगले फळ मिळत नाही. त्यांना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

५. जर कुंडलीच्या दुसऱ्या स्थानात चंद्र असेल आणि त्यावर बुधाची दृष्टी असल्यास खूप मेहनत करुनही यश प्राप्त होत नाही. तसेच काही वेळा त्यांच्यामुळे कुटुंबाची (Family) संपत्तीही नष्ट होते.

६. कुंडलीत चंद्र एकटाच असेल व दुसऱ्या आणि बाराव्या स्थानात कोणताहा ग्रह नसेल तर ते अशुभ मानले जाते. अशावेळी या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. सतत पैसे (Money) खर्च होतात. कर्जाच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : हिरवगार जंगल, धबधबे, व्हॅलीचे सौंदर्य; सर्वकाही एकाच ठिकाणी, 'हे' आहे स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Chandrashekhar Bawankule: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Pooja Sawant Lovestory: आईच्या मैत्रिणीमुळे झाली ओळख, कशी आहे? पूजा सावंतची लव्हस्टोरी

Maharashtra Live News Update : सोलापुरात धावत्या कारला अचानक भीषण आग

'जगाचा अंत अवघ्या महिनाभरात होणार'; नव्या भविष्यवाणीने सर्वत्र खळबळ, नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT