मुंबई : बुधवार हा दिवस सामान्यत: गणपतीला (Ganpati) समर्पित आहे. गणपतीला कोणत्याही कार्यात प्रथम स्थान दिले जाते. गणपती हा बुध्दीचा देवता आहे.
हे देखील पहा -
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, पालनहर्ता मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. गणेशाची मनोभावे पुजा व अर्चना केल्यानंतर आपल्याला सुख,सौभाग्य, धन (Money) व संपत्ती आदीमध्ये वाढ होते. बुध ग्रहावर गणपतीची विशेष कृपा असते.आपल्या कुंडलीत बुध ग्रह हा बलवान असल्यामुळे त्यांच्या व्यवसाय- धंद्यात प्रगती होते. तसेच बुध हा ग्रह बुध्दीचा तारक असल्यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्यास अनेक नवनवीन संधी मिळतात. बुध ग्रहामुळे वक्तृत्व सुधारते. बुधवारी कोणत्या गोष्टी आपण केल्यास आर्थिक व शारीरिक कष्ट दूर करता येतील
बुधवारी हे उपाय करुन पहा -
१. आपल्याला कोणत्याही कार्यात यश मिळत नसेल किंवा काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर अशावेळी आपण दर बुधवारी गणपतीच्या मंदिर जावे. गणपतीला लाल फूल, दूर्वा आणि मोदक अर्पण करावे. आपली मनोकामना पूर्ण होऊन कार्यात यश मिळते.
२. व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रगती होत नसल्यास दर बुधवारी उपवास करावा. तसेच गणपतीचे नामस्मरण करावे. त्यामुळे बुध ग्रह बलवान होऊन करिअरमध्ये प्रगती होईल.
३. बुधवारच्या दिवशी पैसे जपून खर्च करायला हवे. कोणालाही या दिवशी पैसे चुकूनही उधार देऊ नका. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती खालावेल.
४. आर्थिक आणि शारीरिक कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी दुर्गा देवीची उपासना करावी. तसेच गाईला हिरवे पदार्थ खाऊ घालावे.
५. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारच्या दिवशी गणपती किंवा दुर्गा देवीच्या मंत्रांचे उच्चारण करावे.
६. बुधवारच्या दिवशी गणपतीला शेंदूर अर्पण करावे. त्यामुळे घरात सुख आणि समृध्दी लाभेल.
७. मानसिक तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी बुधवारच्या दिवशी गणपतीला शमी पत्र अर्पण करावे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.