Dhanteras 2026: Why Buy A Broom And Where To Keep It At Home? saam tv
धार्मिक

धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू का खरेदी करतात? घरात झाडू कुठे ठेवावे?

Dhanteras Vastu Tips: धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ का मानले जाते? देवी लक्ष्मीशी त्याचा काय संबंध आहे आणि देवी लक्ष्मी घरात कायम राहावी यासाठी झाडूसंबंधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे?

Bharat Jadhav

  • घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याला धार्मिक तसेच व्यावहारिक महत्त्व आहे.

  • झाडू स्वच्छ, कोरड्या आणि अन्नपदार्थांपासून दूर असलेल्या जागी ठेवणे योग्य

  • धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक तथ्य यांमध्ये फरक लक्षात घेणे महत्त्वाचे

दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला 'धनत्रयोदशी' (धनतेरस) हा सण उत्साहात साजरा केला जातो. या परंपरेनुसार, हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला धनत्रयोदशीचा सण यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण केवळ नवीन वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित नाही, तर हा दिवस आयुर्वेद, वैद्यकशास्त्र आणि उत्तम आरोग्याचे अधिपती मानल्या जाणाऱ्या भगवान धन्वंतरी यांच्या उपासनेसाठीही समर्पित आहे.

हा सण संपत्तीचे रक्षक भगवान कुबेर यांच्या उपासनेसाठी आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी लोक सोने-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करतात. यासह झाडू विकत घेऊन ते घरी आणण्याचीही प्रथा आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने झाडू खरेदी करण्यामागचे महत्त्व जाणून घेऊया. लक्ष्मी माता नाराज होऊ नये म्हणून झाडूच्या बाबतीत कोणती खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊ.

२०२६ मध्ये धनत्रयोदशी कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार २०२६ मध्ये धनत्रयोदशी शुक्रवार ६ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाईल. त्याचदिवशी त्याआधी घर स्वच्छ केले जाते. अशीही एक धारणा आहे की, ज्या घरात झाडू नसतो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास नसतो, अशा घरात आर्थिक संकटही उद्भवत असतात.

घरात झाडू ठेवण्याबाबतचे नियम

धार्मिक मान्यतेनुसार, झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे, आदरापोटी झाडू नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. तो उभा करून ठेवणे अशुभ मानले जाते. झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो बाहेरच्या व्यक्तींना दिसणार नाही. तसेच, तो अशा जागी ठेवावा जिथे कोणाचा पाय चुकूनही त्यावर पडणार नाही.

डिस्क्लेमर- ही माहिती पारंपरिक धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीशी सहमत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघर मारहाण प्रकरणात 15 गोविंदांना जामीन मंजूर; शिवसेना पदाधिकारी कोठडीतच

Mobile New Rules: १ नोव्हेंबरपासून मोबाईलवर अनोळखी कॉल करणाऱ्याचे नाव दिसणार? काय आहे CNAP नियम

Nagpur Earthquake : नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले! जमिनीखाली ८ किमी अंतरावर केंद्रबिंदू; ऐन दुपारी नागरिकांची पळापळ

वरिष्ठांचा दबाव? १६-१६ तासांची ड्युटी, सुट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर; मुंबईत एकाच महिन्यात दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा मृत्यू

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक अपडेट

SCROLL FOR NEXT