You have to charge the same mobile, then use these tricks and prolong the battery life 
बातमी मागची बातमी

सारखाच मोबाइल चार्ज करावा लागतोय , मग या ट्रिक्स वापरा आणि बॅटरीची लाइफ वाढवा

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

Mobile Battery : देशात सर्वांनाकडे आज स्मार्ट मोबाइल Smart Mobile आहेत. तसेच कमी किंमतीत Low prices देखील स्मार्ट मोबाइल उपलब्ध आहेत. कमी किंमतीत देखील अधिक सुविधा Facility आणि ऑफर Offer  देणारे आता स्मार्ट फोन सामान्य नागरिकांना ordinary citizens घेणे सोपे झाले आहे. You have to charge the same mobile, then use these tricks and prolong the battery life

स्मार्टफोनमध्ये जितक्या जास्त सुविधा तितका मोबईलचा वापर जास्त होतो.  परिणामी मोबाइलची बॅटरीही अधिक वापरल्या जाते. अनेकांना मोबाइल दररोज चार्ज करावा लागतो. 

मोबईलच्या अतिवापरामुळे बॅटरीचे आयुष्य देखील कमी होत जाते. अचानकपणे महत्वाचे काम करतांना मोबाइल बंद पडतो. अनेकवेळा मोबाइल वारंवार चार्ज 
करावा लागतो. यामुळेच मोबाइलची बॅटरी कशी वाढेल ते जाणून घेऊया. 

हे देखील पहा - 

पहिले आपल्या मोबाइल सेटिंगमध्ये जावे. त्यानंतर तुम्हाला तेथे बॅटरीचा पर्याय दिसणार. हा पर्याय प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या नावांखाली देखील असू शकते. या पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे तुम्हाला बॅटरी सेव्हरचा पर्याय दिसतो. त्यानंतर तेथे आपल्याला तो पर्याय चालू करण्यास सांगितले जाते. हा पर्याय आपल्याच मोबाइलच्या बॅटरीचा वापर कमी करण्यास मदत करते. 

अनेकवेळा असे होते की, मोबाइल लोकेशन आणि जीपीएस ट्रॅकिंग चालूच असते. नेहमी याची गरज असतेच असे नाही. त्यामुळे गरज असेल तेव्हाच त्याचा वापर करावा. 

अनेकांना लाईव्ह वॉलपेपर ठेवण्याची आवड असते. त्यामुळे देखील मोबाइलची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे एखादा साधा फोटो ठेवला तरी चालेल. तसेच मोबाइलमध्ये काळ्या रंगाचा वॉलपेपर ठेवल्याने बॅटरी जास्त वेळ चालते. 

मोबईळेमधील ब्राईटनेस कमी ठेवल्यास मोबाइलची बॅटरी अधिक काळ टिकून राहते.  अनेकदा मोबाइलची  बॅटरी संपेपर्यंत मोबाइल चार्ज केला जात नाही. याचा परिणाम बॅटरीवर होतो. त्यामुळे मोबाइल 15 टक्केवर आला की चार्ज करावा. तसेच 100 टक्केपेक्षा अधिक चार्ज करू नये. 

मोबाइल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवून नका. असे केल्याने बॅटरीवर परिणाम होवून बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते. तसेच बॅटरी लवकर खराब होण्याची भीती असते. 

Edited By - Puja Bonkile 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT