बातमी मागची बातमी

VIDEO | मोदीच्या आवाहानंतर जनता कर्फ्यू

साम टीव्ही न्यूज

 मुंबई:  इंडिगो एअरलाइन्सने ४० टक्के उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अती गर्दीच्या व अत्यल्प गर्दीच्या उड्डाणांचा समावेश आहे. गर्दी टाळण्यासाठी अती गर्दीच्या सेवा बंद असतील. साधारण गर्दी  असलेली उड्डाणे सुरु असतील. त्याअंतर्गत मुंबईहून सुमारे ३५ उड्डाणे रद्द होत आहेत. स्पाइसजेट, एअर विस्तारा व एअर आशिया या कंपन्यांनीही काही देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या मुंबईहून सुटणारी जवळपास ४० उड्डाणे याअंतर्गत रद्द होत आहेत. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर गो एअर आज दिवसभरात एकही विमान उडवणार नाही. गो एअरची मुंबईहून दररोज जवळपास १३० उड्डाणे असतात. ती सर्व रद्द होती. विमान तिकीट रद्द होऊन त्याचे पैसे प्रवाशांना परत मिळण्याबाबत कंपनीकडून प्रवाशांशी संपर्क साधला जात आहे.

करोना व्हायरसने देशातही हाहाकार उडवल्याने करोनाला पायबंद घालण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता यावी म्हणून आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.  गो एअर त्यांच्या सर्व सेवा बंद ठेवणार आहे. अन्य कंपन्याही काही उड्डाणे रद्द करणार आहेत. यामुळे मुंबईहून २०० हून अधिक विमाने रद्द होणार आहेत. शिवाय राज्यातील सर्वच शहरातील बाजार पेठाही बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत मध्यरात्रीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात मध्यप्रदेश आदी आठ राज्यांच्या आंतरराज्य एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

सर्व रेल्वेस्थानकांवर पूर्व व पश्चिम बाजूंकडील मुख्य प्रवेशद्वारांवर पथकं नेमण्यात येणार आहेत. या पथकांत एक जीआरपी, एक रेल्वे पोलीस, महसूल विभागाचे दोन प्रतिनिधी व एक वैद्यकीय कर्मचारी असेल. हे पथक खात्री करूनच प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर प्रवेश देईल, असे दौंड यांनी स्पष्ट केले. मुंबईत मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवेवरील कर्मचारी सोडून सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्रे तपासून स्टेशनवर सोडण्यात येणार असून अन्य प्रवाशांना स्टेशनबाहेरच रोखण्यात येईल, असे कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

कालपासूनच राज्यातील विविध भागात जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवल्या. तर अनेक शहरात सकाळपासूनच मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर तीन दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, तेलंगणा व आंध्र प्रदेश, दादरा व नगर हवेली, छत्तीसगड आणि राजस्थान या मार्गावर एसटी फेऱ्या सुरू आहेत. अन्योन्य करारानुसार एसटी महामंडळाला आठ राज्यांत ११३७ मार्गावर २५४८ फेऱ्या चालवण्याची मुभा आहे. मात्र सद्यस्थितीत एसटीकडून ५७९ मार्गांवर १६५० फेऱ्या चालवण्यात येतात. आरक्षण केलेल्या प्रवाशांना ३१ मार्चनंतर परतावा मिळेल. यामुळे प्रवाशांनी स्थानक आणि आगारांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन महामंडळाने केले आहे.महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेशसह अशा आठ राज्यांतील आंतरराज्य फेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या फेऱ्या बंद राहणार आहेत.

WebTittle :: VIDEO | Janata curfew after Modi's call

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT