Latur
Latur  
बातमी मागची बातमी

लातूरमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख Amit Deshmukh यांच्या शहरात कोविड नियमांची पायमल्ली केल्याने एका हॉस्पिटलची कोविड रुग्णालय म्हणून मान्यता Recognition रद्द Cancelled करण्यात आली आहे. कदाचित एखाद्या रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता रद्द करण्याची राज्यातील पहिलीच घटना आहे. Recognition Of Covid Hospital Revoked In Latur  

लातुर Latur शहरात कोविड Covid रुग्णासंख्येत Patients सातत्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारकडून खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून अटी शर्तीसह मान्यता देण्यात आल्या होत्या. लातूर शहरातील सनराईज Sunrise नावाच्या हॉस्पिटलमध्ये Hospital एकूण 70 कोविड बेडची मान्यता देण्यात आली होती.

 हे देखील पहा -

सदर ठिकाणी रुग्णसंख्या जास्त असताना सुद्धा आवश्यक असणारा इंटेसिव्हीस्ट व फिजिशियन डॉक्टर आणि इतर कर्मचारी कमी असल्याची बाब समोर आली आहे. या दवाखान्यात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक असताना सुद्धा  येथील ICU मध्ये डायलेलसीसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नव्हती. Recognition Of Covid Hospital Revoked In Latur   

या रुग्णालयाला कोविड रुग्णालयाची मान्यता असताना सुध्दा  रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नातेवाईकांना ते बाहेरून उपलब्धकरण्यासाठी प्रिस्क्रिप्शन देखील देण्यात येत होत्या. सादर हॉस्पिटलचे महानगरपालिकेकडून फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले नव्हते. या ठिकाणी बऱ्याच वेळा कोरोना रुग्णांचे नातेवाईक रुग्णांजवळ आढळुन आल्याची बाब समोर आली होती. यामुळे निरोगी व्यक्ती सुद्धा कोविड बाधित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

या सर्व बाबी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी व अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या भेटी व चौकशी दरम्यान उघडकीस  आल्या आहेत. संबधित प्रकारची चौकशी करून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या सुचनेनुसार कोविड रुग्णालय म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच नवीन कोविड रुग्ण दाखल करून घेऊ नये अश्या सूचना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. Recognition Of Covid Hospital Revoked In Latur  

सदर हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना उपचार पूर्ण झाल्यानंतर  हॉस्पिटलचे  निर्जंतुकिकरण करून या ठिकाणी नॉन कोविड उपचार करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख यांनी दिल्या आहेत. 

Edited By : Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT