Vivo V30e 5G Launched in India: चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V30e भारतीय बाजारात लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन या कंपनीचा मिड-रेंज बजेट 5G फोन असून याला 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. या मोबाईलला 5500mAh बॅटरी देण्यात आलीय. तुम्ही हा मोबाईल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. तसेच कंपनीनेही या फोनवर सवलत दिलीय.
Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केलाय. हा या ब्रँडचा नवीन मिड-रेंज डिव्हाइस आहे, जो 5G सपोर्टसह येतो. वीवो कंपनीने Vivo V29e चा पुढील आवृत्ती असलेल्या Vivo V30e मोबाईल लॉन्च केलाय. हा हँडसेट शक्तिशाली प्रोसेसर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येतो. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आणि 5500mAh बॅटरी देण्यात आलीय. हा मोबाईल फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करता येईल. Vivo V30e 5G चे खास फीचर्स जाणून घेऊ.
Vivo V30e किंमत जाणून घ्या
Vivo ने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केलाय. यात 8GB रॅम +128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. तर या मोबाईलच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. जर तु्म्ही हा मोबाईल घेणार असाल तर ICICI बँक आणि HDFC बँक कार्डवर घ्या. कारण कंपनी यावर तब्बल 3000 रुपयांची सूट देत आहे.
तसेच या मोबाईलवर 2500 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6 महिन्यांच्या विना-किंमत ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन ऑफलाइन स्टोअरमधून 10% कॅशबॅकवर खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन वेलवेट रेड आणि सिल्व्हर ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा फ्लिपकार्टवरून प्रीबुक करू शकता.
स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
Vivo V30e 5G मध्ये 6.78-इंचाचा फुल HD+ वक्र AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या हँडसेट Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह येत असते. यात 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं स्टोरेज वाढवता येतो. स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये ऑरा लाईट फंक्शनदेखील देण्यात आले आहे. तसेच कंपनीने या मोबाईलला फ्रंटला 50MP सेल्फी कॅमेरा दिलाय. या डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी 5500mAh बॅटरी वापरली गेलीय.
या हँडसेटला 44W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आले आहे. Vivo V30e मध्ये Android 14 वर आधारित Funtouch OS 14 कस्टम स्क्रिन देण्यात आले आहे. फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटसुद्धा यात देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.