Anganwadi worker 
बातमी मागची बातमी

35 वर्षांपासुन पुरुष सेवक अंगणवाडीचे सांभाळ करत आहे

संजय डाफ, सायली खांडेकर

नंदुरबार : अंगणवाडीमध्ये  Anganwadi सेविका आणि त्यांच्या महिलाच्या मदतीने बालकांना साभाळण्यापासुन, पोषण आहेर वाटप, स्तनदा माता,  किशोरी मुली यांचा सांभाळ करणे  ही सर्व कामे अंगणवाडी सेविकां करत असतात. परंतु हेच काम कोणी पुरुष करत असेल तर, विश्वास बसणार नाही. हा व्यक्ति तब्बल ३५ वर्षांपासुन अंगणवाडीचे सांभाळ करत आहे. The male servant has been looking after the Anganwadi for 35 years

करमसिंग पोहल्या वळवी आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या नर्मदा काठाजवळ असणाऱ्या मांडवा गावाचे आहेत.  ४८ वर्षीय करमसिंग वळवी हे मांडवा गावात अंगणवाडी सेवक म्हणुन  कार्यरत आहे. सातपुडा पर्वत रागांमध्ये बसलेल्या या भागात पोहचने अवघड आहे . त्यामुळे 35 वर्षांपुर्वी शासकीय यंत्रनेतील काही लोक याभागात अंगणवाडी चालवण्यासाठी माणासांचा शोध घेत होते. त्यावेळेस नदीवरपोहायला करमसिंग गेले होते.  तेव्हा त्यांची करमसिंग यांची भेट झाली होती. त्यावेळची चौथी पास आणि लिहीता वाचता येत असल्याने त्यावेळे पासुन करमसिंग वळवी हे अंगणवाडी सेवक झालेत. 

आज करमसिंग वळवी यांच्या मांडवा अंगणवाडी अतंर्गत1 ते 6  वयोगटातील 81 बालक,10 गरोदर माता14  स्तनदा माता, आणि 59  किशोरी मुली आहेत. आज गावातल्या स्त्रीया लहान बालके आणि किशोरी मुली या करमसिंग दादांकडे आवर्जुन बैठकीस येतात.  शासन पोषण आहारासोबतच अनेक योजनांची माहीती कमरमसिंग वळवी त्यांना देत असता.  त्यामुळे महिला अंगणवाडी सेविकांचे काम आजही पुरुष म्हणुन करमसिंग दादा करत आहे.


खऱ्या अर्थाने स्त्रीयांशी निगडीत असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करायचे. त्यात करमसिंग दादा पुरुष यांमुळे स्त्रीयांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी संवाद कसा होणार हा प्रश्न त्यांच्या समोर होता.  मग अशा वेळी त्यांच्या पत्नीने आणि त्यांच्या घरातील मुली सोबत मिळून महिलांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करुन त्यावर समाधान मिळवले. यामुळे करमसिंग वळवींचे कामही सोपे झाले. मुळातच अंगणवाडी अंतर्गत येणारे सर्व लाभार्थी हे अतिदुर्गम भागात राहणारे आहेत. त्यामुळेच स्थानिक भाषेतुन शासन उपक्रमासोबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात करमसिंग वळवी यांना अडचण आली नाही अशी माहिती त्यांच्या मुलीने दिली. 

मांडव्याची ही अंगणवाडी आजही करमसिंग वळवी यांच्या घरामध्ये  भरली जाते. सध्या कोरोना संसर्गामुळे परिस्थिति बिकट झाली आहे. त्यामुळे बालके आणि महिला अंगणवाडीत येत नाही. मात्र गेली पस्तीस वर्षे यांच्या घरात अनेक बालकांची किलकारी गुंजली आहे . घरातल्या अंगणवाडीत येणारे हे सर्व परिसरातले आहेत. अंगणवाडी सेवक करमसिंग वळवी यांच्या मुलींच्या जन्मापासुन 
ते त्यांच्या सोबतच्यांचे अनेक मुल आज अंगणवाडीत येत असल्याने वडील यातुन सामाजीक कार्य करत आहेत. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणीत झाला. मात्र घरच्यांनाही कधी घरात भरणाऱ्या 
अंगणवाडीचा कंटाळा आलाच नाही. विशेष म्हणजे घरात भरणाऱ्या अंगणावाडीचे भाडे देखिल करमसिंग यांच्या परिवाराने शासनाकडुन घेतले नाही. गावात आता नविन अंगणवाडी बनवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे सुख असले तरी आगामी काळात अंगणवाडी घरात भरणार नाही याच दुख देखील असल्याचे करमसिंग वळवी यांच्या कुटुंबाने म्हंटले आहे. .

अंगणवाडी सेवक करमसिंग दादांप्रमाणे 11 जण जिल्ह्यात अंगणवाडी सेवक म्हणुन भरती झाले होते. आज त्यांच्यासह फक्त  04 पुरुष जिल्ह्यात अंगणवाडी सेवक म्हणुन काम करत आहे. त्यांतही करमसिंग दादा पुरुषांमध्ये सिनियरच आहेत. राज्यभर अंगणवाडीचा गाडा हा महिला अंगणवाडी सेविकांमार्फत हाकल्या जात असतांनाच नंदुरबारच्या जांगठी, केवडी, सांबर आणि मांडवा या अतिदुर्गम भागातल्या अंगणवाडीचा कारभार तब्बल 35 वर्षांपासुन पुरुष मंडळींकडुन चालवल्या जात असल्याने ही बाब राज्यात भन्नाटच म्हणावी लागेल.

Edited By - Puja Bonkile 

हे देखिल पहा - 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

SCROLL FOR NEXT