bike ambulance
bike ambulance  
बातमी मागची बातमी

दुर्गम भागातील आरोग्यसेवेसाठी लोकार्पित बाईक अँम्ब्युलन्स धुळखात पडून !

संजय डाफ, सायली खांडेकर

नंदुरबार : मोठा गाजावाजा करत नंदुरबार Nandurbar जिल्हा प्रशासनाने वीस दिवसांपुर्वी लोकार्पण केलेल्या बाईक Bike अँम्ब्युलन्स Ambulance वापराविना धुळखात पडुन असल्याचे चित्र दिसुन येत आहे. निती आयोगाच्या पैशातुन जिल्हा प्रशासाने ६६ लाख रुपये खर्चुन या १० बाईक अँम्ब्युलन्स खरेदी केल्या होत्या.

दोन वर्षे अतिदुर्गम भागात या बाईक अँम्ब्युलन्स ठेकेदारांमार्फतच चालवल्या जाणार आहे. २२ मे ला जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी पाडवी K C Padvi यांच्या हस्ते या बाईक रुग्णवाहीकेचे लोकार्पण झाले.

हे देखील पहा -

मात्र तेव्हापासुनच त्या ठेकेदारांच्या दारात धुळ खात पडुन आहेत. या बाईक अँम्ब्युलन्सच्या चालकांचे प्रशिक्षण आरोग्य विभागाकडुन झाले नव्हते. सोबतच त्यांच्या नियोजीत जागा देखील निश्चित झाल्या नसल्याने त्या उभ्या असल्याचे पुरवठादार सांगत आहे.

मात्र लोकार्पणा आधीही या बाईक अँम्ब्युलन्स तब्बल दिड ते दोन महिने आरटीओची पासिंग झाली नसल्याने उभ्या होत्या. आता पुन्हा तसाच काहीसा प्रकार होत असल्याने रुग्णसेवेसाठी लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या या बाईक अँम्ब्युलन्स उभ्याच राहणार असतील तर मग ठेकेदारांच्या फायद्यासाठीच हि सर्व खटाटोप आहे का असा प्रश्न आता स्थानिक उपस्थित करू लागले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा कांदाप्रश्नी मोठा निर्णय

Accident News : कार आणि घोड्याचा भीषण अपघात; नवरदेवाला मिरवून परतताना वाटेतच मृत्यू

General Knowledge: पासपोर्टचे चार रंग कशावरू ठरवले जातात; जाणून घ्या

Hindu Rituals: लग्नानंतर महिला लाल रंगाची टिकली का लावतात?

Madha Constituency: कार्यकर्त्यांवर दादागिरी कराल तर गाठ माझ्याशी आहे, धैर्यशिल माेहिते पाटलांचा विराेधकांना सज्जड दम

SCROLL FOR NEXT