Akola
Akola  
बातमी मागची बातमी

टरबूज शेतातच सडले; टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर संकट

Jayesh गावंडे

अकोला - झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना Corona संसर्गामुळे अकोला Akola  जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना Farmers याचा मोठा फटका बसत आहे. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथील अनेक शेतकऱ्यांचे शेतातील काढणीला आलेले शेकडो एकरातील टरबूज Watermelon शेतातच सडण्याची Rotting वेळ आली आहे. Crisis on Watermelon Growers

मोठ्या प्रमाणात आलेला लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.  अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख येथे शहापूर वाघोळा ब्रहुत प्रकल्पाच्या भूजल पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी बागायती शेतीची कास धरली. 

हे देखील पहा -

यावर्षी शेतकऱ्यांनी  मोठ्या प्रमाणात टरबूज Watermelon आणि खरबूज Melon पिकांची लागवड केली. पिकांची चांगली मशागत केली. शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये खर्च करून पिक कर्जबाजारी होऊन कसेबसे उभे केले असताना. काही शेतकऱ्यांचे टरबूज पीक हे परिपक्व होण्याच्या वेळेतच निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे करप्या रोगामुळे टरबूज खराब झाले तर अति उष्णतेमुळे टरबुजे जाग्यावरच सडून पडली आहेत. परिपक्व झालेली टरबुजे जाग्यावरच खराब होत आहेत. Crisis on Watermelon Growers            

यातच परिसरात रानडुक्कर हरिण अश्या रानटी प्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी  रात्रंदिवस राबून ७० दिवसाच्या कालखंडामध्ये या टरबूज फळाला लेकरा पेक्षाही जास्त जपले आहे. महागडी कीटकनाशके व औषधे देखील वापरली आहेत.

परिपक्व  झालेल्या व विकण्याच्या वेळेत सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या Lockdown काळामध्ये टरबूज कसे तोडावे हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. फ्रुटमार्केट, बाजारपेठ व  बाजार बंद असल्याने तसेच मागणी नसल्यामुळे फळ कसे तोडावे व कुठे विक्रीला न्यावे या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. Crisis on Watermelon Growers

शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन तयार केलेल्या या टरबूज पिकाला हजारो खर्च करून एक रुपयाही न मिळता कर्जबाजारी झाल्याने यावेळी आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. परिसरातील टरबूज शेतकऱ्याची थेट टरबूज बांधावर शासनाने पाहणी व पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता सर्वत्र होत आहे. 

Edited By - Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT