A year of bitter memories of Corona
A year of bitter memories of Corona 
बातमी मागची बातमी

कोरोनाच्या कटू आठवणींचं वर्ष, वाचा या एक वर्षात काय घडलं काय बिघडलं ?

साम टीव्ही

9 मार्च 2020.
गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रातल्या पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.आणि त्यानंतर सुरू झालं कटू आठवणींचं पर्व असं म्हटलं जातं की मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात कोरोनाच्या या महामारीची नोंद घेतली जाईल.मानवी जीवनावरील कोरोनाच्या झाकोळाची या वाक्यावरूनच आपल्याला कल्पना येईल.

या कोरोनाने गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रात 54 हजार 556 जणांचा बळी घेतलाय. तर या वर्षभरात राज्यातले तब्बल 22 लाख 40 हजार जण कोरोनाबाधित झाले. यापैकी 20 लाख 9 हजार जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तर जगभरात तब्बल 26 लाख 10 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला.

आज वर्षभरानंतर राज्यात 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत हळूहळू सर्व व्यवहार पूर्व पदावर येतायत. पण कोरोनाची महामारी आटोक्यात येतेय, असं वाटत असतानाच राज्यात आता परत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागलीय. त्यामुळे नव्या वर्षावरही कोरोनाचं सावट हळुहळू गडद होऊ लागलंय.
.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT