Lock and Chain
Lock and Chain 
बातमी मागची बातमी

बदलापूर मधील कडक लॉकडाऊन सोमवारी होणार रद्द?

अजय दुधाणे

बदलापूर : कोरोनाच्या वाढीमुळे बदलापुरात कडक लाॅकडाऊन लावण्यात आला होता. या लाॅकडाऊनला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने अखेर हा आदेश मागे घेऊन शासनाच्या आदेशानुसार निर्बंध लागून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. Badlapur Lock Down may be relaxed from Monday

बदलापुरात ८ मे पासून १५ मे पर्यंत लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन बाबत बदलापूर शहरात तीव्र नाराजी होती. या लॉकडाऊनचा शिवसेने सुद्धा विरोध केला होता. आज बदलापूर चे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बदलापूर मधील कडक लॉकडाऊन कल्पना दिली.

हे देखिल पहा - 

तेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना आदेश देऊन महाराष्ट्र शासनच्या पूर्वी च्या  आदेशानुसार  बदलापुर मध्ये लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश दिले.याबाबत जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी कडक लॉकडाऊन  रद्द करण्याबाबत सोमवारी अकरा वाजेपर्यंत आदेश काढणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. 

दुसरीकडे कल्याण ग्रामीण मध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी १० तारखेला सकाळी ७ वाजल्यापासून शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लाॅकडाऊन असणार आहे. Badlapur Lock Down may be relaxed from Monday

या कालावधीत फक्त दवाखाने आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार असून किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात येणार आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT