Rude Behaviour by Ambulance Owner with Women in Sindhudurg
Rude Behaviour by Ambulance Owner with Women in Sindhudurg 
बातमी मागची बातमी

अँब्युलन्स चालकाची मुजोरी..म्हणाला पेशंट तडफडला तरी अँब्यूलन्स मिळणार नाही

भूषण अहिरे

सिंधुदुर्ग :कोरोनाच्या Corona काळात ज्यांच्यामुळे माणुसकी शाबुत राहिली. त्या कोरोना योद्ध्यांपैकीच एक म्हणजे अँम्बुलन्स Ambulance चालक. रुग्णाच्या जीवनमरणाचा धागा हातात असणारा हा कोविड योद्धा Covid Warrior. पण या अँम्बुलन्स चालकाबाबतचाच एक धक्कादायक अनुभव प्रणाली बांदिवडेकर यांना मिळाला आहे.  या संतापजनक प्रकाराची लेखी निवेदनाद्वारे तक्रार बांदिवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह, पोलिस Police अधिक्षकांकडे केली आहे. Ambulance Owner Rude behavior with women in Sindhudurg

प्रणाली बांदिवडेकर यांच्या निवेदनानुसार, प्रणाली बांदिवडेकर यांचा पुतण्या अमोल बांदिवडेकर हा गेल्या दोन माहिन्यांपासून मीठबाव येथील त्याच्या मामाकडे राहत होता. सोमवार दि. १७ मे रोजी त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे देवगड तहसिल कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी देवगड येथून मुंबईला उपचारासाठी हलविण्यास सांगितले.

हे देखिल पहा

त्यासाठी ओरोस येथील अँम्बुलन्स मालक विशाल जाधव यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी देवगड ते मुंबई हे भाडे ३०,०००/- सांगितले. परंतु त्यानंतर त्याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर रात्री ८ वाजता अॕम्बुलन्स देवगड रुग्णालयात पोहोचली. परंतु अँम्बुलन्समध्ये आॕक्सिजन सिलेंडरचे एकच नळकांडे असून त्यात किती ऑक्सीजन आहे, याची अॕम्ब्युलन्स मालकाला व वाहन चालकालासुद्धा कल्पना नव्हती. Ambulance Owner Rude behavior with women in Sindhudurg

तसेच स्ट्रेचरची रुंदी फारच कमी होती व अॕडजेस्टेबल नव्हती. रुग्णास रात्रभर त्रास झाला असता. तसेच खूर्चीला एक हात नव्हता व बसल्यावर पडण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे या अँम्ब्युलन्सने प्रवास करणे धोक्याचे असल्यामुळे सदर अॕम्ब्युलन्सच्या मालकाला फोन करुन त्यांनी अॕब्युलन्स परत पाठविली. त्यावेळी अॕम्बुलन्सच्या मालकांची फोन करून भाडयाची मागणी केली व अरेरावीची भाषा केली.

तसेच सिंधुदुर्गामध्ये एकही अॕम्ब्युलन्स देवगड येथून मुंबईला येणार नाही, अशी मी व्यवस्था केली आहे व तुमचा रुग्ण तडफडून मरेल असेही तो म्हणाला. सदर पाठविलेली अॕम्ब्युलन्स शव वाहिनी होती. एवढ्यावरच न थांबता त्या मालकाने शिवीगाळ करत बांदिवडेकर यांना धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मनोबल खच्ची झाल्याने बांदिवडेकर कुटुंबियाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच एस. पी. कडे सदर अँम्बुलन्स चालकाविरुद्ध तक्रार केली आहे. Ambulance Owner Rude behavior with women in Sindhudurg

रुग्णांसाठी देवदूत असणाऱ्या अँम्बुलन्स चालकाचे हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे या अॕम्बुलन्स चालकावर कोविड - १९ च्या आपतकालिन नियमावलीच्या नियमांप्रमाणे व पोलिस कायद्याप्रमाणे कार्यवाही करून त्याच्या अॕम्बुलन्सची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी विनंती बांदिवडेकर यांनी केली आहे

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: रस्त्यात सापडलेले पैसे उचलणं शुभ की अशुभ?

Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

Chandrahar Patil: वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन 'मविआ'समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!

Today's Marathi News Live : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

SCROLL FOR NEXT