Ajit Pawar
Ajit Pawar 
बातमी मागची बातमी

अजित पवारांचा फोन.....आणि काही तासात औषधे रुग्णापर्यंत.

मिलिंद संगई

बारामती : स्थळ बारामतीतील Baramati विद्या प्रतिष्ठान. शनिवार (ता. 8) सकाळची वेळ. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawarअभ्यागतांना भेटत होते. एक युवक अत्यंत तणावात तावातावाने उपमुख्यमंत्र्यांशी Deputy Chief Minister बोलू लागला....Ajit Pawar helped patient to get the medicine in time

.....माझ्यावर 15 लाखांचे कर्ज झालंय, वडीलांच्या डोळ्यावर उपचार करायचे पण आता पैसेच नाहीत, माझ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नाही....हे बोलताना त्याचे डोळे पाणावले होते....आम्ही दोघे भाऊ शिकत काम करुन उदरनिर्वाह करतोय, गेले 23 दिवस झाले वडीलांसाठी आम्ही संघर्ष करतोय पण यश येत नाही.....पैशांअभावी वडिलांचा एक डोळा अगोदरच गेलेला आहे, आता दुसरा डोळा वाचविणे गरजेचे आहे, दोन दिवसांपूर्वी वडीलांना डिस्चार्ज देणार होते पण बिल भरता येत नसल्याने त्यांना हॉस्पिटल सोडेना....

हे देखिल पहा..

ही कैफियत ऐकल्यानंतर स्वतः अजित पवारही काहीसे भावुक झाले....त्यांनी तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना फोन लावायला सांगितला. उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. लहाने यांना या युवकाला हवी असलेली औषधे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या नंतर डॉ. लहाने यांनीही ही औषधे काही वेळातच आणली. Ajit Pawar helped patient to get the medicine in time

त्या नंतरची अडचण होती ती औषधे मुंबईत आणि त्या युवकाचे वडील पुण्यात दवाखान्यात दाखल होते. सुनीलकुमार मुसळे यांनी मुंबईतील पोलिस कर्मचारी अशोक केदार यांची मदत घेण्याचे ठरविले. केदार मोटारसायकलवरुन जे.जे. रुग्णालयात गेले, दोन बॉक्स मोटारसायकलवर बसत नव्हते, शेवटी त्यांनी त्या औषधांच्या बॉक्ससाठी टॅक्सी केली. टॅक्सीत औषधे व मोटारसायकलवर कसबे असा व्हीटी स्टेशनकडे प्रवास सुरु झाला. मुंबईतून रेल्वेने पुण्यापर्यंत औषधे नेण्याची जबाबदारी पुणे लोहमार्गचे पोलिस निरिक्षक सुरेशसिंग गौड यांनी स्विकारली. त्यांनी निशांत कसबे यांना पुण्याहून मुंबईला ही औषधे आणण्यासाठी पाठविले. 

इकडे मुंबईत  दोन बॉक्स व्यवस्थित नेता येणार नाही म्हणून केदार यांनी क्रॉफर्ड मार्केटमधून नवीन बॉक्स घेतले व त्यात व्यवस्थित औषधांचे पॅकींग केले व ते व्हीटीला आले, तेथे पुणे रेल्वे पोलिस दलातील निशांत कसबे हे वाटच पाहत होते. केदार यांनी कसबे यांना हे औषधांचे बॉक्स दिले. कसबे ही औषधे घेऊन थेट संबंधित रुग्णालयात पोहोचले. Ajit Pawar helped patient to get the medicine in time

अजित पवार यांच्या फोन नंतर अवघ्या काही तासात मुंबईतून ही औषधे संबंधित रुग्णापर्यंत पोहोचली. एका रुग्णाला ही औषधे मिळावी या साठी खुद्द उपमुख्यमंत्र्यांपासून ते डॉ.लहाने, सुनीलकुमार मुसळे, सुरेशसिंग गौड, अशोक केदार व निशांत कसबे या सर्वांनी जे एकत्रित प्रयत्न केले त्या मुळे त्या रुग्णाला त्याचा उपयोग झाला. वैद्यकीय विषयात अजित पवार किती संवेदनशील आहेत, याचीच प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली. 

Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार ३७ मतदान केंद्र

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Camphor Benefits: देवाला प्रसन्न करण्यासह आरोग्यासाठी कापूर आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT