Union Bank Of India Job Saam Tv
naukri-job-news

Union Bank Of India: यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकरीची संधी; ५०० पदांसाठी सुरु आहे भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Union Bank Of India Recruitment: यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. यूनियन बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँकेने अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आली आहे. याबाबत बँकेने अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे. अप्रेंटिस पदासाठी एकूण ५०० जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला लिंक दिसेल त्यावर क्लिक करुन फॉर्म भरायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असावे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

निवड कशी केली जाणार?

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना १०० गुणांची एक परीक्षा घेण्यात येईल. या परिक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांनी मेडिकल परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर मेरिटच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम उमेदवाराला यूनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच unionbankofindia.co.in या वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर होमपेजवर रिक्रूटमेंट सेक्शनवर क्लिक करा.

यानंतर उमेदवारांनी आपली माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागेल.

यानंतर अर्ज शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करावा लागेल.

यानंतर या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT