Government Job Saam Tv
naukri-job-news

UCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती सुरु, पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

UCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे. विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

यूआयसीएलमध्ये विविध पदांसाठी भरती

पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूआयसीएलमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.

यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग वेट, वाइंडिंग इंजिनियर ड्रायव्हर, बॉयलर कम कंप्रेसर या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण १०७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

मायनिंग मेट पदासाठी उमेदवारांना २९,१९० ते ४५,४८० रुपये पगार मिळणार आहे. वाइंडिंग इंजिन पदासाठी २८,७९० ते ४४,८५० रुपये पगार मिळणार आहे. बॉयलर कम कंप्रेसर पदासाठी २८,३९० ते ४४,२३० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता (Eligibility)

मायनिंग वेट पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ३२ असावे. तर बॉयलर कम कंप्रेसर पदासाठी वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्याल आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरायचे आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही. जर तुम्हालाही चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT