Thane Municipal Corporation Recruitment Saam Tv
naukri-job-news

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी;'या' पदांसाठी सुरु आहे भरती;अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

Thane Municipal Corporation Recruitment: ठाणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. वैद्यकीय विभागात ही भरती केली जाते. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती वैद्यकीय आरोग्य विभागात करण्यात येणार आहे. एकूण ३६ विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका महिला, पुरुष आणि बहुउद्देशिय कर्मचारी या पदासाठी रिक्त जागा आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. जवळपास १ वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

वैद्यकीय विभागात नोकरी करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ७ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज करायचे आहेत.वैद्यकीय अधिकारी पदासाठी १२ पदे रिक्त आहेत. परिचारिका महिला पदासाठी ११ पदे आहेत. परिचारिका पुरुष पदासाठी १ जागा रिक्त आहेत. बहुउद्देशीय कर्मचारी पदासाठी १२ पदे रिक्त आहे.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवार MBBS/BAMS पदवीधर असणे गरजेचे आहे. परिचारिका पदासाठी बीएससी नर्सिंगचा कोर्स केलेला असावा. तसेच बहुउद्देशीय पदासाठी उमेदवाराने १२ वी पास असणे गरजेचे आहे. विज्ञान शाखेतून त्याने पदवी प्राप्त केलेली असावी.

याशिवाय सध्या रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. रेल्वे एनटीपीसीमध्ये ११ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट पदासाठी भरती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT