SEBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SEBI Recruitment: खुशखबर! सेबीमध्ये सरकारी नोकरीची संधी; ग्रेड ए पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

SEBI Recruitment 2025: सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेबीमध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेबीमध्ये सध्या असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे. सेबीमध्ये असिस्टंट मॅनेजर होण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेबीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया काल म्हणजेच ३० ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी तुम्ही www.sebi.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

सेबीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. वित्त, अर्थशास्त्र, मॅनेजमेंट, आयटी किंवा कायदा या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

असिस्टंट मॅनेजर पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सेबीमधील या नोकरीसाठी निवड स्टेज १ परीक्षा, स्टेज २ परीक्षा आणि इंटर्व्ह्यूद्वारे होणार आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवले जाईल. यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.स्टेज १ परीक्षा १० जानेवारी २०२६ तर स्टेज २ परीक्षा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाईल.

पगार

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना बेसिक सॅलरी ३५,४०० रुपये मिळेल. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे. १ लाखांपर्यंत पैसे दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता राजसेना विरूद्ध शिंदेसेना, 'गडकिल्ल्यांवरील नमो सेंटर फोडणार'

Sanjay Raut : मोठी बातमी! PM मोदींनंतर CM फडणवीसांकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस,VIDEO

ठाकरे बंधू आयोगाला कोर्टात खेचणार? मतदार याद्यातील घोळावरुन ठाकरे आक्रमक

Health Tips: 'या' कारणांमुळे झोप पूर्ण झाल्यानंतरही जाणवतो थकवा

Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, ठाकरेसेनेची तोफ 2 महिन्यांसाठी थंडावली

SCROLL FOR NEXT